बंटी-बबलीचा कोट्यवधींनी गंडा

बंटी-बबलीचा कोट्यवधींनी गंडा

नागपूर : आतापर्यंत नागपुरातील हजारो गुंतवणूकदारांना बंटी-बबलीने गंडा घातल्याप्रकरणी गुन्हे शाखेत तब्बल 14 गुन्हे दाखल आहेत. याच धर्तीवर यशोधरानगरातील बंटी-बबलीने 25 टक्‍के व्याजाचे आमिष दाखवून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. गणेश प्रतापसिंग ठाकूर (48, रा. बम्बेश्‍वरीनगर) व किरण गणेश ठाकूर (40) अशी आरोपी बंटी-बबलीचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश व पत्नी किरण यांनी यशोधरानगर परिसरात स्वर्गीय शांताबाई बहुद्देशीय विकास संस्था स्थापन केली. संस्थेत नातेवाइकांना आणि मित्रमंडळींना सदस्य बनविले. संस्थेच्या माध्यमातून एक मे 2013 ते 30 सप्टेंबर 2015 पर्यंत हजारो गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या रकमेवर 25 टक्‍के व्याज देण्याची योजना काढली. या योजनेला शहरातील आणि खेडे विभागातील हजारो गुंतवणूकदार भाळले. 
सिंधू बबन पवार (52, रा. भिलगाव) यांनी व्याजाची रक्‍कम पाहता 96 हजारांची गुंतवणूक केली. तसेच नातेवाईक आणि मित्रांनाही संस्थेत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिले. अशाप्रकारे हजारो गुंतवणूकदारांनी या संस्थेत कोट्यवधींची गुंतवणूक केली. सध्या गुंतवणूकदारांची संख्या पाहता 50 लाखांची फसवणूक केल्याची नोंद पोलिसांनी केली. मात्र, या गुंतवणुकींचा आकडा कोट्यवधीत असल्याची माहिती समोर आली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com