बसच्या धडकेत टिप्परचालक ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

शिवनी  भोंडकी) (जि. नागपूर) : : तुमसर-रामटेक मार्गावरील कांद्रीजवळ बसने टिप्परला धडक दिल्याने गुरुवारी (ता. 11) टिप्परचालकाचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव देवेंद्र नथ्थूजी काळसर्पे (रा. नागपूर) असे आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला. मानव विकास विभागाची ही बस असल्याने बसमध्ये विद्यार्थी असतात. मात्र अपघाताच्या काही वेळेपूर्वीच सर्व विद्यार्थी उतरल्याने मोठा अनर्थ टळला.

सकाळी नऊच्या सुमारास वाळू भरलेला टिप्पर तुमसरवरून रामटेकच्या दिशेने जात होता. कांद्री गावाजवळ या टिप्परचे चाक अचानक पंक्‍चर झाले. त्यामुळे चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला लावून टिप्परच्या मागे झाडाच्या हिरव्या फांद्या दिशादर्शक म्हणून लावल्या होत्या. चाकाला जॅक लावून टायर काढण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक मागून आलेल्या बसच्या (क्रमांक एमएच 07 सी 9524) चालकाने टिप्परला जोरदार धडक दिल्याने जॅक घसरले. त्यामुळे टिप्परचालक चाकाखाली आल्याने त्याचा दबून जागीच मृत्यू झाला. बस ही तुमसरवरून रामटेकच्या दिशेने जात होती. मानव विकास विभागाची बस असल्याने यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी होते. मात्र अपघाताच्या पूर्वीच हे सर्व विद्यार्थी आपल्या स्थानकावर उतरल्याने अपघाताच्या वेळी चालक, वाहक आणि केवळ एक व्यक्ती असल्याने मोठा अपघात टळला. आजपर्यंत या मार्गावर वाळूच्या टिप्परने अपघात झाल्याच्या घटना बरेचदा घडल्या. मात्र गुरुवारी या टिप्पर चालकाची कोणतीही चूक नसताना त्याला नाहक जीव गमवावा लागला.
या अपघाताची माहिती मिळताच आंधळगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus driver killed in bus crash