बसस्थानक बनले चोरट्यांचे आगार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

यवतमाळ : बसमध्ये चढत असताना तसेच प्रवासादरम्यान संधी साधून महिलांकडील दागिने व रोख रक्कम चोरी होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यातील बसस्थानक जणू काही चोरट्यांचे आगार बनल्याची प्रचिती येत आहे.

यवतमाळ : बसमध्ये चढत असताना तसेच प्रवासादरम्यान संधी साधून महिलांकडील दागिने व रोख रक्कम चोरी होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यातील बसस्थानक जणू काही चोरट्यांचे आगार बनल्याची प्रचिती येत आहे.

गेल्या वर्षभरात बसस्थानकातून सोने व रोख रक्कम चोरीच्या शेकडो घटना घडल्या आहेत. मुद्देमाल परत मिळविण्यासाठी नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रार करून चौकशीचा ससेमीरा लावून घेतला. मात्र, त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. आता दिवाळीच्या शाळेला सुट्या असल्याने नागरिक नातेवाईकांच्या गावी जाण्याचा बेत आखत आहे. गावी जाताना महिला, पुरुष सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवूनच बाहेर निघतात. बसस्थानकात आलेल्यांना चोरट्यांची टोळी हेरते. बसमध्ये चढत असताना मुद्देमाल लांबविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात अपयश आल्यास बसने प्रवास करून सोन्यावर डल्ला मारून लक्षात येण्यासाठी चोरटे खाली उतरतात. चोरीची घटना लक्षात येईपर्यंत चोरट्यांनी पोबारा केलेला असतो. आरडाओरड केल्यानंतर बस थेट पोलिस ठाण्यात लावण्यात येते. बहुतांश वेळा प्रवाशांची तपासणी करण्यात येते. मात्र, हाती काहीच लागत नाही. यवतमाळ, वणी, नेर, पुसद, उमरखेड, पांढरकवडा, दिग्रस, दारव्हा आदी बसस्थानकात दागिने चोरीला गेल्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. पोलिस गुन्हा दाखल करतात. पुढे काय होते, हे एक कोडेच आहे. 

पोलिसांची नजर कुठे ?
बसस्थानक परिसरात वावरणाऱ्या चोरटे स्थानिकांच्या नजरेस पडतात. टोळीने फिरून सावज टिपतात. मात्र, पोलिसांच्या हाती कसे लागत नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A bus stop has become a resort for thieves