अकोला : व्यावसायिकाने घेतली खदानीत उडी!

businessman committed suicide in akola
businessman committed suicide in akola

अकोला : सिंधी कॅम्प परिसरातील एका संशयीत व्यक्तीने सरकारी गोदामासमोरील खदानीत उडी घेऊन आत्महत्या केली.  याप्रकरणी परिसरातील नागरिकांनी पोलिसाना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी अग्नीशमन विभागासह संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक दाखल झाले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात या दोन्ही पथकाला यश आले नव्हते.

सिंधी कॅम्प परिसरातील मोहन जासुजा (वय २८) या हार्डवेअरचे दुकान असलेल्या व्यावसायिकाने सरकारी गोदामा समोरील असलेल्या खदानीत दुपारी एक वाजता दरम्यान उडी आत्महत्या केल्याची माहिती परिसरातील काही प्रत्यक्षदर्शी बघ्यांनी दिली. याप्रकरणी खदान पोलिसाना माहिती देताच अग्नीशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारी दीड वाजतापासून कर्मचारी मृतदेह शोधण्याचे कार्य करित होते. मात्र, त्यांना अपयश आल्याने पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. हे पथक विविध यंत्र सामुग्रीसह सायंकाळी ७ वाजता दरम्यान घटनास्थळावर पोहचले.

खदानीच्या काठावर आढळली दुचाकी -
खदानीत उडी घेणारे सिंधी कॅम्प परिसरातील मोहन जासुजा हेच आहेत. याची खातरजमा खदानीच्या काठावर एम. एच. ३० एक्स ७२१८ क्रमांकाची स्कुटी आढळून आल्याने झाली. कारण घटनास्थळी हजर असलेले मृतकाचे मोठे भाऊ राजेश जासुजा यांनी ही मोहन याचीच स्कुटी असल्याचे सांगितले. या स्कुटीमध्ये मोबाईलही आढळून आला.

बघ्यांची गर्दी -
घटनास्थळी दुपारी दीड वाजतापासून बघ्यांनी गर्दी केली होती. खदान पोलिसांसह अग्नीशमन विभागाचे फायरमन अशोक प्रधान, विश्वनाथ ढगे, मोहम्मद रिजवान, पंकज पोफळी आणि चालक पंकज जयस्वाल यांनी मृतदेह काढण्याचे कार्य केले. मात्र, रात्री उशीरापर्यंत मृतदेह काढण्यात यश आले नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com