किरकोळ व्यापाऱ्यांकडून प्लॅस्टिक जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नागपूर - महापालिकेने आज सुटीच्या दिवशीही प्लॅस्टिक वापरकर्ते, विक्रेत्यांवर कारवाई केली. परंतु, अनेक दुकाने बंद असल्याने केवळ किरकोळ व्यापाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत एकाला दंड ठोठावण्यात आला, तर दोघांना नोटीस देण्यात आली. एकूण २५.७ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. 

नागपूर - महापालिकेने आज सुटीच्या दिवशीही प्लॅस्टिक वापरकर्ते, विक्रेत्यांवर कारवाई केली. परंतु, अनेक दुकाने बंद असल्याने केवळ किरकोळ व्यापाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत एकाला दंड ठोठावण्यात आला, तर दोघांना नोटीस देण्यात आली. एकूण २५.७ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. 

शहरात काल, शनिवारपासून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. काल, पहिल्याच दिवशी महापालिकेने दहाही झोनमध्ये प्लॅस्टिक विक्रेते, वापरकर्त्यांवर कारवाई करीत १ लाख ५५ हजारांचा दंड वसूल केला; तर साडेपाच टन प्लॅस्टिक जप्त केले. मात्र, कालच्या तुलनेत आज कारवाईत शिथिलता दिसून आली. लक्ष्मीनगर व मंगळवारी झोन वगळता आठ झोनमध्ये आज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. केवळ हनुमाननगर झोनमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली. नेहरूनगर झोनमध्ये दोघांना नोटीस देण्यात आली.

धरमपेठ झोनमध्ये किरकोळ विक्रेत्याकडून अर्धा किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. हनुमाननगर व आशीनगर झोनमध्ये प्रत्येकी १० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. सतरंजीपुरा झोनमध्ये २०० ग्रॅम प्लॅस्टिक जप्त केले. त्यामुळे पहिल्या दिवशी मोठ्या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी कारवाई मंदावल्याचे चित्र होते. मात्र, रविवार असल्याने अनेक दुकाने बंद होती. उद्यापासून पुन्हा जोमाने कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी नमूद केले.

सर्वच ठिकाणी कारवाई 
प्लॅस्टिक बंदीअंतर्गत सर्व दुकाने व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके, रेल्वेस्थानके, वने व संरक्षित वने, इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र आदी ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. दुकानदार, मॉल्स, कॅटरर्स, घाऊक व किरकोळ विक्रेता, वितरक, वाहतूकदार, मंडई, स्टॉल्स आदी ठिकाणीही कारवाई सुरू करण्यात आली. 

कारवाईतून दंड
दंड - ८८०० रुपये
जप्त प्लॅस्टिक  २५.७०० किलो

Web Title: businessman plastic seized crime plastic ban