आयुधनिर्माणीतील संप मागे घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

सोनेगाव (डिफेन्स) (जि. नागपूर) : देशातील 41 आयुधनिर्माणींचे खासगीकरण करून त्यांचे महामंडळात रूपांतरण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. कर्मचारीविरोधी धोरणाविरुद्ध सर्व ऑर्डनन्स फॅक्‍टरीतील कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारून 30 दिवसपर्यंत संप सुरू केला. गुरुवारी संपाचा तिसरा दिवस होता. हा संप तिसऱ्या दिवशीही शंभर टक्‍के यशस्वी झाल्याचा दावा डिफेन्स परिसरातील विविध कामगार संघटनांनी केला. मात्र दिल्लीच्या श्रमभवनातील बैठकीत आंदोलनकर्त्यांशी झालेली चर्चा निष्फळ ठरली.

भाजप संलग्नित बीएमएस ही कर्मचारी संघटनासुद्धा या लढ्यात सहभागी झाली. आंदोलनासंदर्भात बुधवारी (ता. 21) दिल्लीच्या श्रमभवनात श्रमआयुक्तांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली. उच्च अधिकाऱ्यांनी कारखान्यांच्या खासगीकरण व मंडळीकरणाचा विषय सरकारपर्यंत पोचविण्याचे आश्वासन प्रमुख नेत्यांना दिले. सरकारने आयुध कारखान्यांचे खासगीकरण व निगमीकरण केले तरी कर्मचाऱ्यांच्या सेवेला व मिळणाऱ्या सुविधांना धक्का पोहोचणार नाही, असा चर्चेला उपस्थित प्रतिनिधींची समजूत घालण्याचा सरकारी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. पण संयुक्त संघटनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला प्रखर विरोध करीत जोपर्यंत सरकार खासगीकरण, निगमीकरणाचे धोरण रद्द करणार नाही, तोवर आंदोलन स्थगित होणार नाही, असे सूतोवाच केल्याने व बैठकीत अधिकारी व आंदोलनकर्ते नेत्यांच्या मतभेदांमुळे नेमका तोडगा निघू शकला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Call for withdrawal of andolan