थकीत वीजबिलधारकांसह वीजचोरीविरुद्ध मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

भंडारा - पवनी, तुमसर, भंडारा उपविभागात वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध तसेच थकीत वीजबिल धारकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात 27 ग्राहकांविरुद्ध कार्यवाही करण्यात येऊन दोन लाख 27 हजार इतका दंड ठोठावण्यात आला. 

भंडारा - पवनी, तुमसर, भंडारा उपविभागात वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध तसेच थकीत वीजबिल धारकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात 27 ग्राहकांविरुद्ध कार्यवाही करण्यात येऊन दोन लाख 27 हजार इतका दंड ठोठावण्यात आला. 

या कार्यवाहीत वीजवापर कमी होणाऱ्या ग्राहकांचे मीटरसुद्धा तपासण्यात आले. या कार्यवाहीत भंडारा विभागाचे 29 अभियंते व 73 लाइनस्टाफच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. या कार्यवाहीत भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार 25 ग्राहकांवर व कलम 126 नुसार तीन ग्राहकांवर कार्यवाही करण्यात आली. सदर धडक मोहिमेत 197 ग्राहकांचे मीटर तपासण्यात आले. या मोहिमेत भंडारा विभागाचे कार्यकारी अभियंता बी. ए. हिवरकर, अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता श्रीमती इंगळे, उपकार्यकारी अभियंता कहाळे, श्री. गडपाले, श्री. भोयर, श्री. नायडू, सहायक अभियंता श्री. मस्के, हरीश डायरे, श्री. गजभिये, श्री. चाफेकर सहभागी होते. ही कार्यवाही गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. पारधी, भंडारा मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी व अधीक्षक अभियंता शंकर कांबळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. तसेच वरठी वितरण केंदातील पाचगाव व पांजरा या गावी वीजचोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत उपकार्यकारी अभियंता व टंकलेखक पी. जी. सोरते, धम्ममेता, दिनेश गाकरे, कृष्णा चकोले, श्री. सोनटक्के आदी अधिकारी, कर्मचारी यांनी भाग घेतला.

Web Title: Campaign against overdue electricity bill holder

टॅग्स