कॅन्सर इन्स्टिट्यूटवर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कॅन्सर रुग्णालय नाही तर अत्याधुनिक असे कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याच्या सूचना देत कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उभारणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिक्कामोर्तब केले. कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या नकाशात काही सुधारणा गडकरी यांनी केल्या. गडकरी यांनी पुढाकार घेतल्यानेच कॅन्सर इन्स्टिट्यूटचा मार्ग मोकळा झाला आहे, हे विशेष.

नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कॅन्सर रुग्णालय नाही तर अत्याधुनिक असे कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याच्या सूचना देत कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उभारणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिक्कामोर्तब केले. कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या नकाशात काही सुधारणा गडकरी यांनी केल्या. गडकरी यांनी पुढाकार घेतल्यानेच कॅन्सर इन्स्टिट्यूटचा मार्ग मोकळा झाला आहे, हे विशेष.

रामनगर येथील गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर कोहळे, ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे, पंडित दीनदयाल उपाध्याय संस्थेचे संचालक डॉ. विरल कामदार, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेडिकलच्या कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दिवान, नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र)च्या सभापती शीतल उगले उपस्थित होत्या. डॉ. सजल मित्रा यांनी मेडिकलशी संलग्न असलेल्या टीबी वॉर्ड परिसरात साडेसात एकरांत 100 कोटी रुपये खर्चून ही संस्था उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले. दरम्यान, आगामी आठवड्यात नासुप्रला सुमारे 22 कोटी रुपये वळते होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यंत्रासाठी सुमारे 20 कोटींचा निधी हाफकीनकडे वळता झाल्याचीही माहिती त्यांनी दिली.
गडकरी यांनी पुढाकार घेताच कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारणीच्या कार्याला गती आली. नकाशे तयार होऊन ते गडकरी यांच्या समोरही आले. पार्किंगसह इतर गंभीर विषयांकडे अंगुलीनिर्देश करीत गडकरी यांनी काही सूचना केल्या. या संस्थेचे बांधकाम तातडीने सुरू करून त्यात लिनियर एक्‍लिलेटरची व्यवस्था करावी जेणेकरून कर्करुग्णांना येथे अद्ययावत उपचार शक्‍य होतील असेही गडकरी यांनी सांगितले. डॉ. विरल कामदार यांनी या संस्थेच्या उभारणीसंदर्भातील अडचणींना वाट मोकळी करून दिली.

डॉ. कृष्णा कांबळे यांची आस्थेने चौकशी
बैठकीला सुरुवात होताच, कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उभारणीतील महत्त्वाचा दुवा असलेले मेडिकलच्या कॅन्सर विभागातील निवृत्त डॉ. कृष्णा कांबळे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आस्थेने चौकशी केली. त्यांच्याकडून कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात माहिती जाणून घेतली. तर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना डॉ. कांबळे यांच्या सेवेचा लाभ घ्यावा, अशी सूचना गडकरी यांनी केली. पुन्हा सेवेत सामावून घेण्याबाबत प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer Institute