अडीच किलोचा कॅन्सरचा ट्यूमर काढला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

नागपूरः सत्तेचाळीस वर्षीय भाग्यश्री मांगले. 1993 पासून छाती व खांद्याच्या मध्ये कॅन्सरचा "ट्यूमर' घेऊन जगत होती. डॉक्‍टरांना शेकडो चाचण्यानंतर शस्त्रक्रियेतून ट्यूमर काढण्यात यश आले. ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. भाग्यश्री यांच्या नातेवाइकांनी या देवदूतांना हात जोडून आभार मानले. 

भाग्यश्री यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यावेळी उजव्या हाताचे दुखणे होते. केलेल्या निदान चाचण्यातून छाती व खांद्याच्या मध्ये 20 सेंमीचा ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले. 1993 सालापासून हा ट्यूमर असून, कमी करण्यासाठी यापूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, पुन्हा शस्त्रक्रिया सांगण्यात आली. ट्यूमर वाढू लागल्याने श्‍वास घेणे कठीण झाले. उजव्या हाताच्या दिशेने जाणाऱ्या रक्तवाहिन्या दाबल्या गेल्याचेही निदान झाले. हात निकामी झाला होता. 
ऑन्कोलॉजी शल्यचिकित्सक डॉ. आशीष पोखरकर यांनी केलेल्या निदानातून ट्यूमर खांद्या व छातीच्या भागात पसरल्याचे सांगितले. खांद्याचे व छातीचे स्नायू कापून ही शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे नातेवाइकांना सांगितले. शस्त्रक्रियेदरम्यान रक्तवाहिन्यांना इजा होऊ न देता हाडालाही वाचवले. शस्त्रक्रियेला प्लॅस्टिक सर्जन डॉ. राहुल दलाल, भूलतज्ज्ञ डॉ. ब्रिश्‍विक भट्टाचार्य, डॉ. परितोष दलाल आणि डॉ. अमित पाटील यांनी सहकार्य केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer tumor removed

टॅग्स