टायर फुटून अपघात; वाहनाचा चेंदामेंदा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

चालक बचावला; रस्ता दुभाजकावर आदळली कार 
डिगडोह - रविवारी रात्री उशिरा बोल्ट या चारचाकीचा समोरील टायर फुटल्याने अनियंत्रित झालेल्या बोट कारने रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक दिली. या अपघातात चारचाकी उलटून कारचा चेंदामेंदा झाला. परंतु सुदैवाने कारचालकाला कुठलीही इजा झाली नाही. हिंगणा मार्गावर अपघात पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती.

रविवारी (ता. २२) रात्री मंगेश आवारे (वय ३५, गजानननगर, हिंगणा मार्ग) हा प्रवाशांना घेऊन तिवसा येथे गेला होता. रात्री घराकडे परत येत असताना वानाडोंगरी टोलनाक्‍याजवळ यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर कारच्या समोरील डाव्या बाजूचा टायर फुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेली कार रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. कारची दुभाजकाशी धडक होताच कारने दोन पलट्या खाल्ल्या  त्यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. 

दोन महिन्यांपूर्वीच ही कार खरेदी केली असल्याचे गाडीमालक चंदू आवारे यांनी सांगितले. चालक मंगेश आवारे हा गाडीतून सुखरूप बाहेर पडला. सकाळी हा अपघात बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली व घटनेची नोंद घेतली.

Web Title: car accident