सावधान! वणीत सिलिंडरच्या स्फोटाने तीन दुकाने जळाली

file photo
file photo

वणी (जि. यवतमाळ) : येथील वरोरा मार्गावर असलेल्या एकतानगरात असलेल्या चिकन सेंटरमधील गॅस सिलिंडर लीक होऊन लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झालेत. मात्र त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शहरातील एकतानगरात शब्बीर शेख यांचे चिकन सेंटरचे दुकान आहे. पाणी गरम करण्यासाठी दुकानात गॅस सिलिंडरचा वापर केला जात होता. मंगळवारी (ता.15) दुपारी साडेचारच्या दरम्यान गॅस सिलिंडरला अचानक आग लागली. त्यामुळे दुकानातील काम करणारे बाहेर पडले. पाहता पाहता आगीने उग्ररूप धारण केले. लगतच असलेला पानठेला व खानावळीला आगीने आपल्या कवेत घेतले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, ऐनवेळी नवीन असलेल्या अग्निशमन गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने आग विझविण्यासाठी विलंब होत होता. त्यामुळे दुसऱ्या अग्निशमन दलाच्या वाहनाने आग आटोक्‍यात आणली. सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून गर्दीवर नियंत्रण मिळविले. या आगीत किती नुकसान झाले, याची माहिती समजू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com