मालगाडी घसरली

file photo
file photo

नागपूर  : भिलाईहून अलाहाबादच्या दिशेने रवाना झालेली मालगाडी बुधवारी रात्री गोधनी ते भरतवाडा स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. घसरलेले वॅगन थेट रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या खांबावर धडकून वीजपुरवठाही खंडित झाला. घटनेनंतर या मार्गावरील रेल्वेवाहतूक खोळंबली होती. सुमारे 20 महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्या अडकून पडल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला.
अपघातानंतर नागपूर-इटारसीदरम्यानच्या डाउन लाइन वरील गाड्या थांबवून घेण्यात आल्या. कळमेश्‍वर येथे 12804 विशाखापट्टनम स्वर्णजयंती एक्‍स्प्रेस 4.40 तास, 12708 एपी संपर्कक्रांती एक्‍स्प्रेस 5.05 तास थांबवून घेण्यात आले. त्याचप्रमाणे कोहळी स्थानकावर 22416 आंध्र प्रदेश एक्‍स्प्रेसला 5.18 तास, काटोल येथे 12648 दिल्ली-कोयम्बतूर कोंगू एक्‍स्प्रेस 3.30 तास, 18238 अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्‍स्प्रेस नरखेड-कळमेश्वरदरम्यान 5 तास, 12626 दिल्ली-तिरुअनंतपुरम एक्‍स्प्रेस नरखेड-कलमेश्वरदरम्यान 4.30 तास, 12434 चेन्नई राजधानी एक्‍स्प्रेस पांढुर्णा-गोधनीदरम्यान 4.30 तास, 12160 जबलपूर-अमरावती एक्‍स्प्रेस पांढुर्णा-गोधनीदरम्यान 6 तास, 12721 हैदराबाद-दिल्ली दक्षिण एक्‍स्प्रेस कळमेश्वर येथे 1.10 तास आणि 22692 बेंगळुरू राजधानी एक्‍स्प्रेस कळमेश्‍वर येथे 1.10 तास रखडली होती. गुरुवारी सकाळी 5.20 वाजता डाउन मार्गावरील वाहतूक सुरू झाली. 12589 गोरखपूर-सिकंदराबाद एक्‍स्प्रेसला नरखेड, चांदूर बाजार, न्यू अमरावती, वर्धामार्गे पुढे काढण्यात आले.
अप मार्गावर अजनी-नागपूरदरम्यान 12643 तिरुअनंतपुरम-हजरत निजामुद्दीन एक्‍स्प्रेस 1.25 तास, 22415 विशाखापट्टनम-दिल्ली एक्‍स्प्रेस 1.10 तास, 16031 चेन्नई-कटरा एक्‍स्प्रेस 1.20 तास, 19604 रामेश्वरम-अजमेर हमसफर एक्‍स्प्रेस 1.20 तास, 22404 पॉंडीचेरी- नवी दिल्ली एक्‍स्प्रेस 3 तास, 12285 बेंगळुरू-दानापूर संघमित्रा एक्‍स्प्रेस 3 तास, बुटीबोरी ते नागपूरदरम्यान 12721 हैदराबाद-हजरत निजामुद्दीन एक्‍स्प्रेस 3 तास, 12539 यशवंतपूर-लखनऊ एक्‍स्प्रेस 3 तास अडकून पडली होती. मध्यरात्रीनंतर 1.15 वाजता हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला. 22112 नागपूर-भुसावळ एक्‍स्प्रेस सकाळी 7.20 ऐवजी 11.20 वाजता तर 51829 नागपूर-इटारसी पॅसेंजर सकाळी 8 ऐवजी दुपारी 1.20 वाजता रवाना झाली. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेप्रशासनातर्फे प्रवाशांना चहा आणि बिस्कीट वितरित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com