शिक्षकांसह कंत्राटदारांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेल्या घटनेला जवाबदार असणाऱ्या विरूद्ध कारवाई करावी मागणीसाठी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते सजंय वानखडे, भारिप जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभाताई अवचार, गजानन  गवई, सजंय नाईक, गजानन कांबळे, सुनील वानखडे, अन्ना वाकोडे, सखाराम वानखडे, यांच्या नेतृत्वाखाली दिड तास चक्का जाम अंदोलन छेडले. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी प्रा.सजंय खडसे, पोलिस उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे, ठाणेदार पी. के. काटकर यांनी घटनेची फिर्याद दिल्यावरून कारवाई करण्यात येईल अशा आश्वासनानंतर वाहतूक सुरळीत झाली.

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलिस ठाणे हद्द येणाऱ्या दांळबी येथील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (ता.२८) सायंकाळी उघडकीस आली होती. प्रकरणी शुक्रवारी (ता.२९) घटनेची पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

फिर्यादीवरुन मुख्याध्यापकांसह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
घटनेतील दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शुक्रवारी (ता.२८) सकाळी दांळबी बस थांब्यावर  संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दीड तास चक्का जाम अंदोलन छेडले. दोषींवर कारवाई केली जाईल या आश्वासनानंतर  महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

प्राप्त माहितीनुसार बोरगाव मंजू पोलिस ठाणे हद्द येणाऱ्या दांळबी येथील सत्यवान वाहुरवाघ व सुभाष  चक्रनारायण रा. दाळंबी यांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात फिर्याद दिली कि, विद्यार्थी नामे गौरव  सत्यवान वाहुरवाघ (वय १३), संघर्ष  सुभाष चक्रनारायण (वय १३) हे शंकर विद्यालय, कोळंबी येथे सातव्या वर्गात शिकत होते. गुरुवारी शाळेच्या वेळेत शौचालयला जाण्याच्या कारणावरुन सुटी मागीतली. शाळेत शौचालय असूनही शौच्छास बाहेर जाण्यास सांगीतले. विद्यार्थी परिसराबाहेर  गेले असता ग्रामपंचायत मधील ई-क्लास गट क्रमांक ३७२ या जागेवर अवैध उत्खनन केलेले आहे. सदर  उत्खननाची ग्रामपंचायतची कुठलीही परवानगी न घेता हे उत्खनन व्हावे हायवे सहाचे काॅन्ट्रक्टर  मोहीत देशमुख यांनी यंत्र सामुग्री लावून जवळपास शाळेपासून २० मीटर अंतरावर अंदाजे २० फुट  खोल व ५० फुट लांबी व २० फुट रुंदी मोठ्या प्रमाणात उत्खनन  कोणतीही महसुली शासकीय  अधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता हे उत्खनन करण्यात आले होते. या उत्खननात आलेल्या पावसाचे पाणी साचले या अवैध उत्खननाची ग्रामपंचायत कोळंबी यांनी तहसील, पोलिस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दिली होती. तक्रारीकडे अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल्याने या दोन निष्पाप विद्यार्थ्यांचे डुबून मृत्यू झाला. याला जवाबदार शंकर विद्यालय कोळंबी येथील मुख्याध्यापक रामेश्वर वक्टे, संजय  कुकडे, नंदकिशोर ठाकरे, विश्वास राऊत, काॅन्ट्रॅक्टर मोहीत देशमुख व महसूल विभाग यांच्यावर कारवाई करावी अशा फिर्याद दिल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेल्या घटनेला जवाबदार असणाऱ्या विरूद्ध कारवाई करावी मागणीसाठी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते सजंय वानखडे, भारिप जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभाताई अवचार, गजानन  गवई, सजंय नाईक, गजानन कांबळे, सुनील वानखडे, अन्ना वाकोडे, सखाराम वानखडे, यांच्या नेतृत्वाखाली दिड तास चक्का जाम अंदोलन छेडले. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी प्रा.सजंय खडसे, पोलिस उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे, ठाणेदार पी. के. काटकर यांनी घटनेची फिर्याद दिल्यावरून कारवाई करण्यात येईल अशा आश्वासनानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: case filed against teacher in borgaon manju Akola