अतिक्रमणप्रकरणी गुन्हा दाखल करणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नागपूर - ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्या अनिल भगवानदास जयसिंघानी, अनिल राजवानी व इतरांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना देण्यात येईल, असे आश्‍वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरंजन डावखरे, नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्यांनी उत्तर दिले. संबंधीत गुन्हेप्रवृत्तीच्या समाजकंटकांनी अत्याचार, विनयभंगाच्या धमक्‍या प्रामाणिक उद्योजकांना देऊन त्यांचे भूखंड हडप करण्यात आले.

यासंदर्भात मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय उपस्थित झाला असता संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्‍वासन सरकारने दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने या गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा उपद्रव उल्हासनगरमध्ये वाढला असून, त्यांच्या मुसक्‍या तातडीने आवळण्याची आग्रही मागणी निरंजन आणि नरेंद्र पाटील यांनी केली. या वेळी डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित व्यक्‍ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याची स्पष्ट कबुली दिली. जयसिंघानी आणि राजवानी यांनी भूखंडावर अतिक्रमण करून तेथील कायदा सुव्यवस्था धोक्‍यात आणल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. या घटनेची गुन्हे अन्वेषण विभागाकडूनची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. ही चौकशी येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना गजाआड केले जाईल, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

Web Title: The case will be registered against encroachment