यंदा तरी होणार का जातनिहाय जनगणना?

Census
Census

१ मार्च २०२१ पासून सुरू होणार काम; केंद्र शासनाने निश्‍चित केली तारीख
नागपूर - राष्ट्रीय जनगणनेचे काम एक मार्च २०२१ पासून सुरू होणार आहे. तशी अधिसूचना केंद्र शासनाने काढली आहे. त्यामुळे यंदातरी जातनिहाय जनगणना होणार का, हाच खरा प्रश्‍न आहे. 

दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येते. मागील जनगणना २०११ मध्ये झाली होती. त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा समोर आल्याने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी अनेकांनी केली. विशेष करून ओबीसी समाजाचा सूर यासंदर्भात आग्रही होता. त्यानंतर ऑक्‍टोबर २०११ मध्ये सामाजिक आर्थिक जातगणना करण्यात आली होती. लोकांच्या आर्थिक स्थितीसोबत जातीचीही माहिती घेण्यात आली. याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करायचे होते. मात्र, याला दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. याचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला होता. यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या. ज्यांना जात दर्शवायची नाही, त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर ज्यांना जात सांगायची नाही, त्यांच्या नावासमोर जातीचा उल्लेख टाळण्यात आला होता. या सामाजिक, आर्थिक जातगणनेमुळे जातीसोबत, आर्थिक स्थितीही  समोर आली. आरक्षणासाठी लोकसंख्येचा आधार घेण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे अनेक सरकारी योजनांवर निधी खर्च करतानाही याचाच आधार घेण्यात येतो. त्यामुळे जातनिहाय लोकसंख्या जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, ती जाहीर करण्यात आली नाही. जातनिहाय जनगणनेवरून चांगलेच वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले. आता जनगणनेसंदर्भात केंद्राच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार मार्च २०२१ पासून याचे काम सुरू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com