वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून गुराख्यांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

उमरेड (जि. नागपूर) : तारणा वनपरिक्षेत्रातील शिवारात गुरे चारण्यास गेलेल्या गुराख्यांना कुही वन्यजीव वनक्षेत्र अधिकाऱ्याकडून मारहाण झाली. यात दोन गुराखी गंभीर जखमी झाले; तर अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना सोमवारी (ता. 26) संध्याकाळी उघडकीस आली. कुही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तारणा जंगलात काही स्थानिक गुराखी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे त्यांच्या गायी-बैलांना सतीघाट जलाशयावर पाणी पाजण्यासाठी घेऊन गेले. कुही वन्यजीव वनक्षेत्राधिकारी घनश्‍याम ठोंबरे यांनी गुराख्यांवर अचानक लाठीमार केला. त्यात शांताराम लुचे (वय 53, तारणा) आणि अरुण शेळके (वय 60) या दोन गुराख्यांना जबर दुखापत झाली.

उमरेड (जि. नागपूर) : तारणा वनपरिक्षेत्रातील शिवारात गुरे चारण्यास गेलेल्या गुराख्यांना कुही वन्यजीव वनक्षेत्र अधिकाऱ्याकडून मारहाण झाली. यात दोन गुराखी गंभीर जखमी झाले; तर अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना सोमवारी (ता. 26) संध्याकाळी उघडकीस आली. कुही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तारणा जंगलात काही स्थानिक गुराखी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे त्यांच्या गायी-बैलांना सतीघाट जलाशयावर पाणी पाजण्यासाठी घेऊन गेले. कुही वन्यजीव वनक्षेत्राधिकारी घनश्‍याम ठोंबरे यांनी गुराख्यांवर अचानक लाठीमार केला. त्यात शांताराम लुचे (वय 53, तारणा) आणि अरुण शेळके (वय 60) या दोन गुराख्यांना जबर दुखापत झाली. याशिवाय एकनाथ गणेश आमटे (वय 40), मोहनदास लुचे (वय 55), संजय इरपाते (वय 43, तिघेही रा. तारणा) यांनासुद्धा काठीने मारले असल्याची तोंडी तक्रार उमरेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे पोलिस ठाण्यात दाखल झाले. सोबत मोठ्या प्रमाणात गावकरी हजर होते. पोलिस ठाण्यात आरोपी वनाधिकारी ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर दुखापत झालेले शांताराम लुचे व अरुण शेळके यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी "रेफर' करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांनी दिली. या प्रकरणाचा रीतसर तपास करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल, असेही ते बोलले.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cattle beating by forest officers