सीबीआयचे नागपुरात "सरप्राईज चेक'

सीबीआयचे नागपुरात "सरप्राईज चेक'
नागपूर : शासकीय कंपन्यांमधील अपहाराच्या संशयावरून सीबीआयच्या पथकांनी शुक्रवारी नागपूरसह देशभरातील एकाच दिवशी तब्बल 25 ठिकाणी आकस्मिक तपासणी केली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नव्याने करण्यात आलेल्या विद्युतीकरणाच्या कामांची प्रत्यक्ष झाडाझडती घेण्यात आली. कारवाईनंतर अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सीबीआयमधील सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय विभाग आणि सार्वजनिक उपक्रमांमधील कामांसंदर्भात स्थानिक सामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांकडून व्यक्त होणाऱ्या संशयावरून ही आकस्मात तपासणी करून वास्तविकतेचा शोध घेण्यात येत आहे. नागपूरसोबतच दिल्ली, मुंबई, कोलकाता, गोवा, भोपाळसह एकूण 25 ठिकाणी आज एकाच वेळी कारवाई करण्यात आली.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात अलीकडेच नागपूर-नैनपूर आणि नागपूर-छिंदवाडा मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यात आले असून विद्युतीकरणाची कामे प्रगतिपथावर आहेत. विद्युतीकरणाच्या कामांमध्ये अपहार झाल्याची शंका असून त्यादृष्टीने एका मार्गाची प्रत्यक्ष तपासणी करण्यासह झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती आहे. तपासणी करण्यात आलेला मार्ग कोणता ते मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या विषयासंदर्भात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता, सीबीआयच्या कारवाईसंदर्भात ते अनभिज्ञ असल्याचे समोर आले. रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणाची जबाबदारी "रेल्वे इलेक्‍ट्रिफिकेशन' या स्वतंत्र विभागाकडे असल्याचा युक्तिवाद काही अधिकाऱ्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com