दुर्दम्य इच्छाशक्तीने यश ‘संभव’

मंगेश गोमासे
रविवार, 27 मे 2018

नागपूर - ऐन परीक्षेच्या वेळी काटोल मार्गावरील सेंटर पॉईन्ट येथील बारावीला असलेला रत्नसंभव शाहू याला संधिवाताने पछाडले. तो बारावीची परीक्षा देऊ शकेल काय? यावरही प्रश्‍नचिन्ह होता. मात्र, त्याच्या दुदैम्य इच्छाशक्तीने दुखण्यावर मात करुन ते ‘संभव’ केले. 

शनिवारी बारावीचा निकाल लागल्यावर त्यात ८० टक्के गुण मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता.

बारावीमध्ये विज्ञान शाखेत असलेला रत्नसंभव शाहू हा फेब्रुवारी महिन्यात शाळेतील प्रिलीम्स परीक्षा देत असताना,  त्याला संधिवाताचा सौम्य ॲटक आला. त्यामुळे कशी बशी त्याने प्रिलीम्स आणि प्रात्यक्षिक परीक्षा दिली. पाच मार्चपासून बारावीची मुख्य परीक्षा सुरू होणार होती. मात्र, संधिवाताच्या त्रासामुळे पाच ते सात तास अभ्यास करणे रत्नसंभवला अशक्‍य होत होते.

त्याची आई केंद्राच्या पुरातत्व सर्व्हेक्षण विभागात आहेत. तर वडील नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्व विभागात प्राध्यापक आहेत. ऐन परीक्षेच्या वेळी आई नंदिनी शाहू यांची कोलकत्याला बदली झाली. त्याला सोडून जाणे हे नंदिता शाहू यांच्यासाठी दु:खदायक होते. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती बरीच दु:खदायक होती. यावर मात करुन रत्नसंभवने मनाशी निर्धार केला.  काही पेपर त्याला ‘व्हीलचेअर’वर द्यावे लागले. इंग्रजी, फिजिक्‍स, कॉम्प्युटर सायन्स त्याचे आवडते विषय असल्याने त्याने फिजिक्‍समध्ये ८९ तर इंग्रजीमध्ये ९५ गुण घेत, ८० टक्के मिळविले. मात्र, इतर विषयात मिळालेल्या गुणाबद्दल समाधान नसल्याने त्याने या विषयाचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात रत्नसंभवला ‘एस्ट्रोफिजिक्‍स’मध्ये करिअर करायचे असून नागपूर विद्यापीठातून पदवी घ्यायची इच्छा आहे. 

रत्नसंभवच्या परीक्षा काळातील दिवस बरेच दु:खदायक होते. मात्र, त्याच्या इच्छाशक्तीमुळेच तो परीक्षा देऊ शकला. आज त्यातून मिळालेले यश हे त्याच्यासाठी बरेच मौल्यवान आहे. शिवाय आमच्यासाठी आनंददायी आहे. 
- नंदिता शाहू 

Web Title: CBSE Result education success motivation