esakal | सीसीआयची कापूस खरेदी सुरू; कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय थांबणार
sakal

बोलून बातमी शोधा

CCI starts buying cotton at Rajura Bazar Samiti

पूर्वी एका सातबाऱ्यावर ४० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात येत होती. आता एका शेतकऱ्याचा पूर्ण कापूस एकाच सातबाऱ्यावर खरेदी होणार आहे. मात्र, त्यामध्ये एका सातबाऱ्यावर पहिल्या दिवशी ४० क्विंटल पंधरा दिवसाच्या फरकाने ४०-४० क्विंटल अशा पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे.

सीसीआयची कापूस खरेदी सुरू; कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय थांबणार

sakal_logo
By
श्रीकृष्ण गोरे

राजुरा (जि. चंद्रपूर) : सीसीआयअंतर्गत कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा येथील किसान जिनिंग अँड प्रेसिंग तुलना व गणेश कोटेक्स खामोना येथे गुरुवारपासून सीसीआय कापूस खरेदी शुभारंभ झाला आहे. प्रथम कापूस विक्रीचा बहुमान चंदनवाही येथील सुनंदा जीवतोडे व गोवरी येथील हरीचंद्र जुनघरी या शेतकऱ्यांना मिळाला.

कोरोना प्रादुर्भावामुळे कापूस खरेदीला विलंब झाल्याने गतवर्षी कापसाची खरेदी करण्यामध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. तरीसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश कापूस खरेदी राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने केली होती. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये व शेतकऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी डीजिटल पद्धतीने कापसाची नोंदणी करण्यात यावी अशा सूचना सभापती कवडू पोटे यांनी केल्या आहे.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

पूर्वी एका सातबाऱ्यावर ४० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात येत होती. आता एका शेतकऱ्याचा पूर्ण कापूस एकाच सातबाऱ्यावर खरेदी होणार आहे. मात्र, त्यामध्ये एका सातबाऱ्यावर पहिल्या दिवशी ४० क्विंटल पंधरा दिवसाच्या फरकाने ४०-४० क्विंटल अशा पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे.

कोणत्याही शेतकऱ्याला खाजगी व्यापाऱ्याकडे कापूस विकण्याची नामुष्की येणार नाही. सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कवडू पोटे यांनी दिली.

अधिक वाचा - 23 नोव्हेंबरपासून शाळा सूरू, शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक!

आम्हाला आनंद झाला
डीजिटल पद्धतीने शेतकऱ्यांच्या कापसाची नोंदणी झाल्याने व त्वरित कापूस खरेदी होत असल्याने आम्हाला आनंद झाला. मागील वर्षी झालेली गैरसोय यावर्षी होणार नाही. मात्र, शेतकऱ्यांचा सर्व प्रकारचा कापूस खरेदी करणे आवश्यक आहे.
- पदमाकर उरकुडे,
शेतकरी, साखरी

संपादन - नीलेश डाखोरे