सीसीटीव्ही दोन महिन्यांपासून बंद

शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

सीसीटीव्ही दोन महिन्यांपासून बंद
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनात परीक्षेसंदर्भात बरीच गोपनीय व महत्त्वाची कागदपत्रे असून, त्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. कारण, परिसरात दहा वर्षांपूर्वी लावलेले सीसीटीव्ही दोन महिन्यांपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन महिन्यांतील कुठल्याही प्रकाराचे "फुटेज' विद्यापीठाकडे नसल्याचे समजते.

परीक्षेच्या संदर्भातील सर्वच कामे परीक्षा भवनातून चालते. त्यामुळे गुणपत्रिका, पदवी, निकाल, उत्तरपत्रिकांसारखी इतर महत्त्वाची कागदपत्रे या परिसरात असतात. त्याच्या सुरक्षेसाठी विद्यापीठाकडून परीक्षा भवनात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून कर्मचाऱ्यांवरही नियंत्रण ठेवता येणे शक्‍य होईल हाही त्यामागचा हेतू होता. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी परीक्षा भवनात सीसीटीव्ही लावले. केवळ परीक्षा भवनच नव्हे तर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्येही सीसीटीव्ही लावले.
मात्र, विद्यापीठातील सीसीटीव्ही दोन महिन्यांपासून बंद असल्याने परीक्षा भवनाच्या भिंतीवर केवळ डबे लावल्याचे चित्र आहे. विद्यापीठाच्या परीक्षा भवनाशी निगडित अनेक प्रकरणे घडली आहेत. यामध्ये कोहचाडे, चुनोडकर आणि अनेक प्रकरणांचा समावेश आहे. असे असताना परीक्षा भवनाची सुरक्षा भगवानभरोसे सोडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

परीक्षा भवनातील सीसीटीव्ही बंद आहे. त्यांची सुधारणा करता येणे अशक्‍य आहे. त्यामुळे नव्याने सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, निविदा मागविण्यात येणार आहेत. मात्र, सुरक्षा आणि गोपनीयतेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे.
- डॉ. नीरज खटी,
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

Web Title: CCTV closed news

टॅग्स