नागपूर रेल्वेस्थानक झाले "डोळस'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

नागपूर रेल्वेस्थानक झाले "डोळस'
नागपूर : "इंटिग्रेटेड सेक्‍युरिटी सिस्टिम'अंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकावर 240 सीसीटीव्ही लावण्यासह अन्य उपाययोजना करण्यात आले आहेत. या यंत्रणेचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 13) सकाळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यंत्रणेमुळे नागपूर स्थानक अधिक डोळस झाले आहे.

"सकाळ'ने स्टिंग ऑपरेशनद्वारे रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले. सकाळच्या वृत्तामालेनंतर रेल्वे प्रशासन खळबळून जागे झाले. बरेच अनधिकृत मार्ग बंद केले. प्रवेशद्वारावर अंडर व्हेईकल स्कॅनिंग सिस्टीम लागली आहे. आता रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा सीसीटीव्हींच्या टप्प्यात आणला आहे. "सकाळ'च्या सततच्या पाठपुराव्यामुळे अनेक अडचणींची शर्यत पार करीत सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रकल्प मार्गस्थ झाला, हे विशेष. रेल्वे स्थानकावर बसविलेल्या 240 अत्याधुनिक सीसीटीव्हींमुळे परिसर दृष्टिक्षेपात आला आहे. अत्याधुनिक स्वरूपाची कंट्रोल रूमही सज्ज झाली आहे. एकाच ठिकाणावरून रेल्वेस्थानकाच्या काना कोपऱ्यावर वॉच ठेवणे शक्‍य झाले आहे.
यंत्रणेचे वैशिष्ट्य

- 360 अंश फिरनारे कॅमेरे
- अंधारातही चित्रीकरणाची सुविधा
- गुन्हेगारांचे छायाचित्र यंत्रणेत फिड असणार
- जुने गुन्हेगार कॅमेऱ्याच्या टप्प्यात येताच बिप वाजणार

Web Title: CCTV for Nagpur railway station