कायदा, सुव्यवस्थेसाठी सीसीटीव्ही आवश्‍यक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नागपूर - शहरातील चौकाचौकांत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ई-चालान पाठविण्यास सुरुवात केली. "सकाळ'ने सर्वप्रथम या प्रकरणी वृत्त प्रकाशित करून जनजागृती निर्माण केली. आज "सकाळ'च्या वृत्ताचे कात्रण सोशल मीडियावर फिरत होते. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. सीसीटीव्ही शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचा सूर नेटिझन्सचा होता. 

रस्त्यावर युवकांची बाइक स्टंटबाजी आणि वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीमुळे चाप बसेल. यासोबतच वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्यास पोलिस अधिकाऱ्यांना कॅबिनमधूनच कंट्रोल करता येईल. 
-दीप्ती राऊत 

उपराजधानीची क्राइम सिटी म्हणून ओळख होऊ नये म्हणून सीसीटीव्ही फायद्याची ठरू शकते. त्यासाठी पोलिसांनीही प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. निर्णयाची अंमलबजावणी योग्यपणे व्हायला हवी. अन्यथा सीसीटीव्हीचा कोणताही फायदा नाही. 
- सविता जाधव-जगताप 

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे आहे. रस्त्यावर चेनस्नॅचिंग, मारहाण आणि लूटमारीवर याप्रकारे नियंत्रण ठेवता येणे शक्‍य आहे. मात्र, केवळ सीसीटीव्हीच्या भरोशावर पोलिसांनी राहू नये. स्वतःही प्रामाणिकपणे गस्त घालून नागरिकांना सुरक्षेची हमी द्यावी. 
-शिवानी भोरे 

शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा उपयोग होईल. पोलिस आयुक्‍तांचा सकारात्मक निर्णय आहे. वाहतूक पोलिसांच्या डोक्‍यावरील बराच मोठा ताण कमी होणार आहे, तसेच वाहनचालकांवर नियंत्रण मिळविण्यात यश येईल. 
- प्रकाश पाटील 

सीसीटीव्हीच्या कव्हरेजमध्ये चालान किंवा अन्य कारवाई करण्याचे निर्देश आयुक्‍तांनी वाहतूक उपायुक्‍तांना द्यावे. जेणेकरून केवळ वाहनचालकांच्या खिशातून पैसे काढण्यासाठी नव्हे तर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सीसीटीव्हीचा उपयोग व्हावा. वाहतूक पोलिस विभागातील भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवावे. 
- सूरज रघुवंशी 

Web Title: CCTV requirement for law and order