दिवाळी साजरी करताय? हे लक्षात घ्या 

टीम ईसकाळ 
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

नागपूर : दिवाळीची लगबग सुरू झाली असून, सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण आहे. अनेकांची खरेदी झाली असून, जवळपास फराळही तयार झालेला आहे. आता वाट आहे ती दिवाळीच्या दिवसाची. मात्र, दिवाळीत होत असलेली सजावट, रोषणाई आणि आतषबाजी यामुळे दुर्दैवी घटना व्हायला एक कारणही पुरेसे असते. अशा घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नाही. आपला व कुटुंबीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काही खबरदारीचे उपाय सुचविले असून, त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 

नागपूर : दिवाळीची लगबग सुरू झाली असून, सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण आहे. अनेकांची खरेदी झाली असून, जवळपास फराळही तयार झालेला आहे. आता वाट आहे ती दिवाळीच्या दिवसाची. मात्र, दिवाळीत होत असलेली सजावट, रोषणाई आणि आतषबाजी यामुळे दुर्दैवी घटना व्हायला एक कारणही पुरेसे असते. अशा घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नाही. आपला व कुटुंबीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काही खबरदारीचे उपाय सुचविले असून, त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 
भारतात अनेक सण उत्साहाने साजरे केले जातात. परंतु, दिवाळी हा एकमेव सण आहे, ज्यात पहाटे उठून केलेले अभ्यंगस्नान, दारात आकाशकंदीलाचा उजेड, लखलख करणाऱ्या दिव्यांनी सजवलेले घर, अंगात नवे कपडे, फराळ आणि फटक्‍यांची आतषबाजी केली जाते. महत्वाचे म्हणजे, लहान मुलांना फटाक्‍यांचे सर्वात जास्त आकर्षण असते. फटाके फोडताना पालकांनी योग्य काळजी न घेतल्यास मोठ्या नुकसानाला समोरे जावे लागते. यावेळी पालकांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणत्या प्रकारचे फटाके फोडण्यापासून लहान मुलांना थांबवू शकाल याचा पालकांनी विचार करायला हवा. 
दिवाळीत फटाके फोडत असताना अनेकांना इजा झाली असल्याची बातमी आपल्या कानावर नेहमी पडत असते. यात जीवितहानीही मोठ्या प्रमाणात होते. सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने, निष्काळजीपणा आणि उदासीनता यामुळे अशा घटना होत असतात. तसेच दिवाळीत फटाके फोडताना अनेकांचे जीवन धोक्‍यात येते. ही जीवित हानी टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
दिवे मुलांपासून दूर ठेवा 
दिवाळीत दिव्यांनी घराची सजावट करताना ती मोकळ्या जागेतच लावावीत. पडदे, बिछाना यापासून ते लांब असतील याची काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दूर आणि उंचीवर ठेवावे. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा. तुटलेल्या वीजतारा वापरू नये किंवा जोड देताना योग्य दर्जाच्या "इन्सुलेशन टेप'ने त्या सुरक्षित करून घ्यावेत. घरात कुणीही नसताना विद्युत उपकरणे बंद करावीत.
फटाके फोडताना हे लक्षात असू द्या 
फटाके मोकळ्या जागेतच फोडा, फटाक्‍यांना हातात घेऊन फोडू नका, वाकून फोडू नका, अर्धवट जळणा फटाक्‍यांजवळ जाऊ नका, घरावर फटाके फोडू नका, खिशात ठेऊ नका, जळणाऱ्या दिव्यापासून दूर ठेवा, वारा सुरू असेल तर उडणारे फटाके फोडू नका, फटाक्‍यांना सुरक्षित स्थळी ठेवा, फटाके फोडताना लांब फुलझडी किंवा मेणबत्तीचा वापर करा, हात सरळ ठेवा, गाड्यांजवळ फटाके उडवू नका. कारण, गाड्यांजवळ ऑईल, पेट्रोल, डिझेल सांडलेले असते. या वस्तू लगेच पेट घेऊ शकतात. 
फटाके फोडताना दोन बादली पाणी जवळ ठेवा. छोटी आग मोठी होणार नाही याची काळजी घ्या, खराब फटाके पाण्यात ठेऊन त्याची विल्हेवाट लावा.
सुती कपड्यांचा वापर करा 
फटाके फोडताना शरीर पूर्णपणे झाकेल असे कपडे घाला. टेरीलीन, पॉलिस्टर, नायलॉन आदी कपडे न घातला सुती कपड्यांचा वापर करा. कारण, सुती कपडे लवकर पेट घेत नाही. ढिले कपडे घालू नका.
दुखापत झाली तर हे करा 
फटाके फोटताना दुखापत झाल्यास जळणा भागावर काही प्रमाणात थंड पाणी टाका, अधिक जळले असेल तर आग विझवून शरीरावरील कपडे काढून स्वच्छ चादरमध्ये गुंडाळून दवाखाण्यात घेऊन जा, डोळ्याला इजा झाल्यास थंड पाणी मारा, लहानांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानेच फटाके फोडावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrating Diwali? Consider this