आमदार आकाश फुंडकर यांच्यासह व्यापारी बांधवाचा जल्लोष!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

खामगाव : लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशात भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात खामगांव विधान सभेतून घसघशीत 34 हजार मतांचे मताधिक्य देऊन खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयाची हॅट्रीक सुनिश्चित केली.

खामगाव : लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशात भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात खामगांव विधान सभेतून घसघशीत 34 हजार मतांचे मताधिक्य देऊन खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयाची हॅट्रीक सुनिश्चित केली.

या विजयाचा जल्लोष कृषी उत्पन्न बाजार समिती खामगांव येथे व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. आतीषबाजी व पेढे वाटून हा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी  दिलीप पाटील संचालक, मुन्ना पुरवार , प्रमोदसेठ अग्रवाल, पवनसेठ झुनझुनवाला, बनवारीसेठ टिबडेवाल, संतोषसेठ डिडवाणी, सुरेशसेठ अग्रवाल,फत्तेलाल चांडक, देवेशसेठ भगत,अजय अग्रवाल, सुभाषसेठ केडीया, गौरव टिबडेवाल, ओम शर्मा, दिलीप केडीया, गणेश सोनोने, अनिल केडीया, सतिषआप्पा दुडे, राम मिश्रा, महादेव ठाकरे, कृष्णा ठाकुर, संजय भागदेवाणी, पवन गरड, , विक्की हटटेल, हितेश पदमगिरवार, विक्की रेठेकर, रमेश भटटड, दिलीप गुप्ता, संजय मोहिते, अशोक मानकर, अशिष सुरेका, पंकज शर्मा,निखील सेवेक, गोलु आळशी यांची उपस्थिती होती

तसेच काल सायंकाळी शहरातील गांधी चौक, जलंब नाका, घाटपुरी नाका, शिवाजी स्टेडीयम, या सह संपुर्ण गावात प्रचंड आतीष बाजी करुन विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी श्री संजय शिनगारे, शहराध्यक्ष, नगराध्यक्षा अनिता डवरे, मुन्ना पुरवार, राम मिश्रा, वैभव डवरे, राजेंद्र धनोकार, अशोक मानकर, सतीष आप्पा दुडे, ओम शर्मा, अॅड. रमेश भटटड, यांचे सह मोठया प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebration by Akash Fundkar in Khamgao