‘पहले आप’मध्ये रखडले सिमेंट रस्ते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते होत आहेत. तिसऱ्या टप्प्यातही ३९ किमी रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश निघाले. परंतु, निधीअभावी या रस्त्यांचे काम रखडले आहे. राज्य सरकार व महापालिकेत निधीसाठी ‘पहले आप, पहले आप’ सुरू असून, नासुप्रने दिलेला निधी पडून आहे.

नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते होत आहेत. तिसऱ्या टप्प्यातही ३९ किमी रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश निघाले. परंतु, निधीअभावी या रस्त्यांचे काम रखडले आहे. राज्य सरकार व महापालिकेत निधीसाठी ‘पहले आप, पहले आप’ सुरू असून, नासुप्रने दिलेला निधी पडून आहे.

शहरात पहिल्या टप्प्याच्या रस्त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ५४.४५ किमीचे रस्तेही पूर्णत्वास येत आहेत. यातील ३९ किमीचे रस्ते पूर्ण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिसऱ्या टप्प्याच्या रस्त्याचीही घोषणा केली होती. त्यानुसार महापालिकेने तिसऱ्या टप्प्यात शहरातील ३९.५६ किमीच्या रस्त्यांचा समावेश केला. हा प्रकल्पही तीनशे कोटींचा आहे. या प्रकल्पासाठी नासुप्र, राज्य सरकार व महापालिका प्रत्येकी शंभर कोटी देणार आहे. या रस्त्यांच्या कामाचे कार्यादेश निघाले. परंतु, पैसा नसल्याने राज्य सरकारने त्यांच्या हिश्‍यातील शंभर कोटी द्यावे, असा आग्रह महापालिकेने धरला. मात्र, राज्य सरकारने सर्वप्रथम महापालिकेने शंभर कोटींची तडजोड करावी, असा हट्ट धरला आहे. महापालिका व राज्य सरकारच्या या ‘पहले आप, पहले आप’मुळे तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांचा प्रकल्प रखडला आहे.

निधी इतरत्र खर्च होण्याची भीती
तूर्तास कंत्राटदारांकडून रस्त्यांमध्ये कुठे पाइपलाइन, विजेच्या तारा आदी तर नाही, याबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागपूर सुधार प्रन्यासने या प्रकल्पासाठी हिश्‍शातील शंभर कोटींपैकी ६५ कोटी रुपये दिले असून, ते पडून असल्याचे सूत्राने नमूद केले. सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती बघता हा निधी इतरत्र खर्च होण्याची भीतीही सूत्राने व्यक्त केली.

Web Title: Cement Road Issue