निधीअभावी रखडले सिमेंट रस्त्याचे काम

Road
Road

नागपूर - शहरातील सिमेंट काँक्रिटचे रस्ते निधीअभावी रखडले असताना आता केंद्राच्या निधीतून तयार होत असलेल्या रिंग रोडला मिळणाऱ्या निधीची गती मंदावली आहे. यामुळे केंद्रीय निधी योजनेतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची कामे रखडल्याची माहिती पुढे आली. 

केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत ४१.४५  किलोमीटरच्या रिंग रोडचे काँक्रिटीकरण केले जात आहे. या रस्त्याचा कालावधी दोन वर्षांचा निश्‍चित होता. निविदा २० टक्के कमी दराने कंत्राटदाराला दिल्याने २९२.७२ कोटींच्या रस्त्याची किंमत २६० कोटींवर आली. त्यापैकी आतापर्यंत केवळ १४९ कोटींचा निधी मिळाल्याची माहिती सूत्रांनी  दिली. यामुळे कंत्राटदारांची देयके थांबली आहेत. त्याचा फटका रिंग रोडच्या कामाला बसला. कामाची वाढलेली व्याप्ती आणि कामामुळे कालावधी वाढल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, निधी न मिळणे हे मुख्य कारण असल्याची बाब पुढे आली. 

सिमेंट काँक्रिटचे काम ३४ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानात केल्यास कामाचा दर्जा खालावतो. उन्हाळ्यात तापमानही ४५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असते. त्या तापमानात काम करणे कठीण असल्याने तशीच कामाची गती कमी असताना आता निधीचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने कामे रखडली आहेत. 

सल्लागाराचे दुर्लक्ष 
सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी सल्लागार म्हणून खासगी कंपनीची नियुक्ती केली होती. मात्र, त्यांनी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या कामावर नियंत्रण ठेवले नसल्याची बाब सीआरआरआयच्या चमूच्या लक्षात आली. त्यामुळे सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यामध्ये त्रुटी आहेत. तसेच काही खराब झालेले पॅनल बदलले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com