केंद्रात पुन्हा भाजपच - रहाटकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

वर्धा - भाजपच्या ११ कोटी सदस्यसंख्येत महिलांची संख्या उत्तम आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. देशातील नऊ कोटी महिलांच्या सन्मानार्थ स्वच्छतागृह, आठ कोटी महिलांना मुद्रा लोन, सहा कोटी महिलांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत सिलिंडर, दोन कोटी कुटुंबांना आवास योजनेचा लाभ, महिलांच्या सुरक्षिततेवर भर दिला. अशा अनेक देशव्यापी कामांमुळे केंद्रात भाजप पुन्हा बहुमतासह सत्तेत येईल, असा विश्‍वास भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया  रहाटकर यांनी व्यक्त केला.  

विदर्भातील तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आलेल्या विजया रहाटकर यांनी रविवारी (ता. २४) शहरात पत्रकार परिषद घेतली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. 

विजया रहाटकर पुढे म्हणाल्या, केंद्र सरकारने हजारो गावांमध्ये प्रधानमंत्री सौभाग्य योजना पोचविली. महिला सुरक्षित राहण्याकरिता पास्को कायदा अंमलात आणला. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा, २६ महिने मातृत्व रजा आणि मुस्लिम महिलांकरिता तीन तलाकवर बंदीचा निर्णय घेतला.  आगामी निवडणुकीच्या निमित्ताने गावागावांत पोहोचून महिलांची मते जाणून घेत भाजपच्या घोषणापत्रात महिलांच्या अपेक्षांची दखल घेण्याकरिता महिला आघाडी अभियान  राबवीत आहे. याअंतर्गत मंगळवारी (ता. २६) कमळ ज्योती अभियान राबविण्यात येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Government BJP Vijaya Rahatkar Politics