केंद्र सरकारचे व्यावसायिक वेबपोर्टल लवकरच

नागपूर : लघुद्योजकांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी; शेजारी डॉ. कृष्ण गोपाल आणि लघुद्योग भारतीचे पदाधिकारी.
नागपूर : लघुद्योजकांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी; शेजारी डॉ. कृष्ण गोपाल आणि लघुद्योग भारतीचे पदाधिकारी.

नागपूर : व्यावसायिक वेबपोर्टल क्षेत्रातील बदलते अर्थकारण पाहता लवकरच लघू-सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारच्या वतीने वेबपोर्टल बनविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबपोर्टलवर होणारी विक्री, त्याकडे आकर्षित होणारा ग्राहकवर्ग पाहता, हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. लघुद्योग भारतीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाअंतर्गत झालेल्या उद्यमी संमेलनात ते "सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग : समग्र धोरण' या विषयावर बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल आणि लघुद्योग भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी सरसंघचालक के. सी. सुदर्शन यांनी देशातल्या तेलबियांतून इंधन तयार होऊ शकते, असे फार पूर्वी सांगितले होते. तेव्हा लोक त्यांच्यावर हसायचे. मात्र, माझे सहमत होते. त्यांचे भाकीत प्रत्यक्षात उतरवले. आज लाखो लोकांना त्यापासून रोजगार मिळत असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. वेगवेगळ्या संकल्पना लघुद्योगांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी आधुनिकतेशी सांगड घालणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com