वाडीत सेवानिवृत्तांसाठी केंद्रीय उपचार केंद्र सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

वाडी (जि.नागपूर) : सेवानिवृत्त पेन्शनर्स कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी केंद्रीय आरोग्य उपचार योजनेअंतर्गत मागील 8 वर्षांपासून अथक संघर्षानंतर वाडीत आरोग्य उपचार केंद्राला मंजुरी व प्रत्यक्ष केंद्राची स्थापना होऊन प्रारंभ झाला. हजारो वयोवृद्ध केंद्रीय पेन्शनर्स व त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या संदर्भात सेंट्रल गव्हर्न्मेंट सिव्हिलियन पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव पी. के. मोहनन, अध्यक्ष जे. पी. शर्मा यांनी ही माहिती दिली. 

वाडी-दत्तवाडी, आठवा मैल, लावा, दाभा परिसरात केंद्रीय विभाग आयुधनिर्माणीतून सेवानिवृत्त झालेले किमान 2 हजार कर्मचारी कुटुंबीयांसह राहतात. सी.जी.एस.एच. योजनेअंतर्गत त्यांना आरोग्याची तपासणी व औषधोपचारासाठी नागपूर स्थित सेमिनरी हिल्स परिसरात जावे लागायचे. या वयात शारीरिक, आर्थिक, मानसिक समस्येचा सामना करावा लागत होता. परिस्थिती विचारात घेत सेंट्रल गव्हर्नमेन्ट सिव्हिलियन पेन्शनर्स असोसिएशनने सीजीएचएसचे एक उपचारकेंद्र वाडी परिसरात स्थापण्याच्या मागणीसाठी 2011 पासून संघर्ष सुरू केला. नागपूर, कोलकता, दिल्ली मुख्यालयापर्यंत पत्र, निवेदन, आंदोलनाच्या माध्यमातून या केंद्राच्या स्थापनेसाठी मागणी करण्यात आली. खासदार कृपाल तुमाने यांच्या सहकार्याने 2014 ला वाडी परिसरात या उपचार केंद्राच्या स्थापनेला दिल्ली मुख्यालयातून मान्यता मिळाली. दरम्यान, पेन्शनर्सच्या एका दुसऱ्या गटाने हे उपचार केंद्र वाडीऐवजी डिफेन्स परिसरात सुरू करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर निवेदन दिले. दुसरीकडे वाडी नगर परिषदचे काही राजकीय नेते, नगरसेवकांनी वर्तमान नगर परिषदेची इमारत या उपचार केंद्राला देण्यासाठी विरोध दाखविल्याने 2014 ते 2018 पर्यंत ही कार्यवाही थांबली होती. दरम्यान, पर्यायी व्यवस्था म्हणून पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनने दत्तवाडी गुरुप्रसाद नगरस्थित प्लॉट क्रं.75 चे रिकामे घर केंद्रीय स्वास्थ्य विभाग नागपूर कार्यालयाला उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले. गुरुप्रसादनगरातील रघुनाथ शेळके यांच्या निवासस्थानी बगीच्याजवळ दत्तवाडीला मंगळवारी हे उपचार केंद्र सुरू करण्यात आले. हे उपचार केंद्र सुरू झाल्याची माहिती होताच पेन्शनर्स व त्यांच्या परिवारात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या आरोग्य उपचार केंद्राचे अधिकृत उद्‌घाटन 19 ऑगस्टला सकाळी दहा वाजता खासदार कृपाल तुमाने यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central treatment center for retired retirees started