चेनस्नॅचिंगसह मोबाईल हिसकावून नेणारे त्रिकूट गजाआड

 चेनस्नॅचिंगसह मोबाईल हिसकावून नेणारे त्रिकूट गजाआड
नागपूर : चोरलेल्या वाहनावर बसून शहरात चेनस्नॅचिंगसह मोबाईल हिसकावून नेणारे त्रिकूट गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. कारवाई करणाऱ्या पथकाला पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी 50 हजार रुपयांचे रिवॉर्ड जाहीर केले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
गोलू ऊर्फ कृष्णा बोकडे (24) रा. रेशीम ओली, इतवारी, पप्पू बुरडे (21) रा. लाल दरवाजा, पाचपावली आणि राकेश हेडाऊ (24) रा. जीवन वाडी, नंगा पुतळा अशी चोरट्यांची नावे आहेत. झिंगाबाई टाकळी, काळे ले-आउट येथील रहिवासी आशा बानाईत या गुरुवारी दुपारी घराजवळच नातवासोबत खेळत बसल्या होत्या. त्याचवेळी तिन्ही आरोपी पांढऱ्या रंगाच्या ऍक्‍टिव्हावरून आले. गोधनीचा पत्ता विचारला. पुढे निघाले असता मागे बसलेल्या आरोपीने आशा यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून घेतली. यानंतर आरोपी जरीपटका हद्दीतील पॉवरग्रीड परिसरात पोहचले. पायी फिरणारे अमिर हक एनूल हक यांच्याकडून 5 हजार रुपये रोख आणि मोबाईल हिसकावून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच गुन्हेशाखेचे पथक सक्रिय झाले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे कृत्य कैद झाले. फुटेजवरील माहिती खबऱ्यांना पाठविण्यात आली. थोड्याच वेळात पथकाला आरोपींबाबत सुगावा लागला. त्यातून पप्पूला त्याच्या घरून अटक करण्यात आली. त्यानंतर गोलू अटक करण्यात आली. पोलिस मागावर असल्याचे कळताच राकेशने आपल्या आईसह मानकापूर ठाण्यात पोहोचून आत्मसमर्पण केले. घटनेनंतर सहा तासांच्या आत तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. आरोपींनी चोरीसाठी वापरलेली ऍक्‍टिव्हा पहिल्या घटनेच्या सुमारे तीन तासांपूर्वी इतवारी रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमधून चोरली होती. गोलूवर यापूवीचे 15 गुन्हे दाखल असून राकेशवर दोन तर पप्पूवर दोन गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच त्यांनी पारडीतून वाहन चोरले होते, क्रीडा चौकातून मोबाईल तर सक्करदरा हद्दीतही जबरी चोरी केली असल्याची माहिती राजमाने यांनी दिली. पत्रकार परिषदेला सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com