दुरांतो एक्‍स्प्रेसमधून नागपूरच्या महिलेचे मंगळसूत्र लांबविले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

इगतपुरी : नागपूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या "दुरांतो एक्‍स्प्रेस'मध्ये तीन ते चार अज्ञात इसमांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही घडना दुरांतो एक्‍स्प्रेसमध्ये घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अनिता चिंचोलीया (वय 50, रा. नागपूर) या दुरांतो एक्‍स्प्रेसने (ट्रेन क्रमांक 12290) नागपूर ते मुंबई असा एस 4 या बोगीतून प्रवास करत होत्या. शुक्रवारी ही एक्‍स्प्रेस रात्रीच्या सुमारास भुसावळ स्थानकावरून निघाल्यानंतर माहिजी ते म्हसावददरम्यान गाडी थांबली असता अनोळखी व्यक्तीने अनिता चिंचोलीया यांच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाची 32 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने ओढत पळ काढला. त्यांनी लागलीच गाडीच्या दरवाज्याजवळ जाऊन बघितले असता तीन ते चार तरुण पळत जात मागील कोचमध्ये चढताना दिसले. याबाबत अनिता चिंचोलीया यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दिली. घटना भुसावळ लोहमार्ग हद्दीत घडली असल्याने तक्रारीची कागदपत्रे संबंधितांकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजोग बच्छाव यांनी दिली.

Web Title: chain snatching at durantro express