विदर्भातही आंदोलनाला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत वाहतूक ठप्प 

नागपूर - नागपूरसह बुलडाणा, वाशीम, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात सकल मराठा समाजातर्फे विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ३१) चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा  समाज व अ. भा. युवक मराठा महासंघातर्फे नागपुरात मंगळवारी दुपारी साडेअकराला चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

मराठा समाजाने ३१ जानेवारीला संपूर्ण राज्यभरात चक्काजामचा इशारा दिला होता. मराठा समाजातर्फे दुपारी साडेबाराला गणेशपेठ चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. गणेशपेठ पोलिसांनी ३० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले.

यवतमाळ : जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंगळवारी सकाळी शांततेत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

महागावात बसस्थानकाजवळील तुळजापूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या वेळी युवकांनी ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा दिल्या. उमरखेडमध्ये ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत पाच ठिकाणी  चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दिग्रस, पुसद येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

चंद्रपूर - मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आणि धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

अकोला - मराठा समाजातर्फे बुलडाणा व वाशीम जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वाशीम जिल्ह्यात तब्बल ५० ठिकाणी चक्काजाम आंदोलन करून शासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. रिसोड तालुक्‍यातील २० गावांत, मालेगावातील २५ गावांत, मंगरूळपीर तालुक्‍यातील पाच गावांत, कारंजा तालुक्‍यात चक्काजाम आंदोलन झाले. बुलडाणा, मेहकर, शेगाव, लोणार, मलकापूर, जळगाव जामोद, चिखली, खामगाव, सिंदखेडराजा, देऊळगावराजा आदी तालुक्‍यांच्या ठिकाणी चक्काजामला प्रतिसाद मिळाला. हिमस्खलनात शहीद जवानांचे  पार्थिव मंगळवारी अकोल्यात आणल्यामुळे मराठा समाजातर्फे शहीद संजय खंडारे, आनंद गवई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: chakka jam agitation in vidarbha