Maharashtra vidhansabha 2019 : मतदानाची टक्‍केवारी वाढविण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नागपूर : लोकसभेतील मतदानाची टक्‍केवारी पाहता विधानसभेत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. या आव्हानावर प्रशासन कशा प्रकारे मात करते, हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.
लोकशाही प्रक्रियेत मतदानाला महत्त्व आहे. मताच्या आधारावर लोकप्रतिनिधी व सत्ताधारी निश्‍चित होतो. निवडणुकीत बहुमत मिळणारा उमेदवारच विजयी ठरतो. त्यामुळे मतांची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाचा आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही विविध योजना राबविण्यात येतात.

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी होता. मतदारांची संख्या वाढली; मात्र मतदानाची टक्केवारी तुलनेत वाढली नाही. उलट कमी झाली. नागपूर लोकसभा मतदारसंघात 55 तर रामटेक लोकसभा मतदारसंघात 62 टक्केच मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी कमी होणे हे प्रशासनाच्या दृष्टीने अपयश असल्याचे मानण्यात आले.
आता विधानसभेची निवडणूक होणार आहे. नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात मागील वेळी सरासरी 54 टक्‍के मतदान झाले होते. ग्रामीण भागातील सहाही मतदारसंघात सरासरी 66 टक्के मतदान झाले. मागील विधानसभेच्या तुलनेत जवळपास साडेसहा लाख मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतही वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, लोकसभाचा निकाल पाहता टक्केवारी वाढविणे प्रशासनासमोर मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The challenge of increasing voter turnout