चांपा बलात्कार प्रकरणातील पाचही आरोपींना जन्मठेप

file photo
file photo

नागपूर, : कुही तालुक्‍यातील चांपा गावातील बहुचर्चित सामूहिक बलात्कार आणि चोरीच्या प्रकरणात शुक्रवारी (ता. 9) नागपूर सत्र न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींनी शेतात राहणाऱ्या अठरा वर्षांच्या मुलीवर तिच्या नातेवाइकांना बेदम मारहाण करून सामूहिक अत्याचार केला होता.अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी हे आदेश दिले. आतिश भोसले (26, चांपा), दिनेशराज चौहान (22, हरदा, मध्य प्रदेश), शशिकपूर भोसले (21, चांपा), गुलाबचंद भोसले (23, हरदा) रवी भोसले (28, हरदा) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे ऐकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांना भादंवि 376 (2) (जी), 395, 397 कलमानुसार न्यायालयाने दोषी ठरवीत जन्मठेप आणि प्रत्येकी 26 हजार रुपये दंडाची शिक्षा ठेठावली. ऍड. नितीन तेलगोटे यांनी सरकारी पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडली.पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार, जिल्ह्यातील कुही तहसीलअंतर्गत येणाऱ्या चांपा गावात 19 जानेवारी 2013 रोजी ही घटना घडली. या गावातील शेतामध्ये काही कुटुंबे राहत होती. घटनेच्या दिवशी आरोपी काठ्या आणि घातक शस्त्रांसह या परिसरात दाखल झाले. त्यांनी शेतात असणाऱ्या घरात प्रवेश करीत कुटुंबातील स्त्री-पुरुष आणि लहान मुलांना मारायला सुरुवात केली. काहींनी सामानाची चोरी करीत घरात तोडफोड केली. त्या वेळी दहावीत शिकणारी 18 वर्षीय युवतीदेखील त्या ठिकाणी होती. आरोपींची त्या मुलीवर नजर गेली. त्यांनी कुटुंबीयांना एका खोलीत डांबले आणि युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी बाहेर पडले आणि जवळपासचे घर त्यांनी लुटले. यामध्ये काही नागरिक गंभीर जखमी झाले. या प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी कुही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com