Rain Update : राज्यात 'या' भागात पुढील ३ दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, IMD चा इशारा!

rain update (file photo)
rain update (file photo)esakal

महाराष्ट्रात सगळीकडे कडक उन्हाचा पारा चढला आहे. दरम्यान आता काहीसा गारवा निर्माण शक्यता आहे. आजपासून (२१ मे) पुढील ३ दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहेत.

पावसासोबत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे देखील वाहणार आहे, आयमडी पुणे विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार कायम असून, उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. दरम्यान, रविवारी आजपासून विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. २०) राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोला येथे ४४.४ अंश सेल्सिअस इतकी झाली. मराठावाडा आणि मध्य महाराष्ट्रातदेखील बऱ्याच भागात कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे आहे. सध्या पश्चिम विदर्भापासून, छत्तीसगड ते उत्तर तेलंगणापर्यंत, तसेच कर्नाटकपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

मंगळवारपर्यंत (ता. २३) नव्याने पश्‍चिमी चक्रावाताची स्थिती निर्माण होणार असून, याचा परिणाम वायव्य भारतावर होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवसांत राज्याच्या तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. (महाराष्ट्र ताज्या बातम्या)

rain update (file photo)
Raj Thackrey: '...परत त्यांना मतदान केलंत तर चाबकाने मारीन'! राज ठाकरेंनी भरला दम

तसेच प्रादेशीक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनचे अंदमानात निर्धारित वेळेत आगमन झाले असून, लवकरच ते केरळमध्ये दाखल होणार आहेत.

केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांचा पुढेही प्रवास अडथळाविना कायम राहिल्यास मॉन्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात धडकण्याची शक्यता आहे.

पुणे शहर आणि परिसरातसुद्धा उन्हाचा ताप जाणवू लागला आहे. शनिवारी (ता. २०) शहरात ३८.५ अंश सेल्सिअस इतके होते. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर शहर व परिसरात कमाल तापमानात चढ-उतार कायम राहणार आहे. मात्र उन्हाची स्थिती अशीच राहणार आहे.

rain update (file photo)
Sameer Wankhede : समीर वानखेडे प्रकरणात मोठी अपडेट, NCB चा गंभीर आरोप!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com