चांदा दारूगोळा भांडाराचे वाहन उलटले

file photo
file photo

समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील गोविंदपूर शिवारात चांदा दारूगोळा भांडाराचे वाहन दुभाजकावर उलटले. सोमवारी (ता. 17) रात्री झालेल्या या अपघातात दोघे जखमी झाले. अशोक शिवशंकर यादव, रा. नागपूर व सुदर्शन सुदाम पटेल, रा. चांदा अशी जखमींची नावे आहेत.
पोलिस सूत्रानुसार, चंद्रपूर येथील चांदा दारूगोळा भांडाराचे वाहन नागपूरवरून चंद्रपूरकडे जात होते. दरम्यान, समुद्रपूर तालुक्‍यातील गोविंदपूर शिवारात चालकाचा ताबा सुटल्याने हे वाहन दुभाजकावर धडकले. या अपघातात वाहनातील अशोक यादव व सुदर्शन पटेल हे दोघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक भरत कऱ्हाडे, कांचन नवाते, किशोर लभाने, विनोद थाटे, प्रवीण चव्हाण, दीपक जाधव, प्रवीण बागडे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून जखमींना बाहेर काढले. त्यांना महामार्गाच्या रुग्णवाहिकेने बोरखेडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com