संग्रामपूरातील वरवट बकाल शिवारात चंदन तस्करी रॅकेट सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

गोपनीय माहितीचे आधारे वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. गाडी आणि तोडलेल्या मालाचा पंचनामा करून 40 हजाराचे चंदन असल्याची माहिती दिली. 

संग्रामपूर (बुलढाणा) : तालुक्यातील वरवट बकाल शिवारात चंदन तस्करी चे रॅकेट सक्रिय झाले आहे. तोडलेली दोन झाडे पकडली. भरदिवसा झाडे तोडणारे मोटरसायकल शेतातच ठेऊन पळून गेल्याची घटना 3 ऑगस्टचे दुपारी घडली. गोपनीय माहितीचे आधारे वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. गाडी आणि तोडलेल्या मालाचा पंचनामा करून 40 हजाराचे चंदन असल्याची माहिती दिली. 

sangrampur

वरवट बकाल शिवारातील बळीराम संपत ढगे याचे शेताचे धुऱ्यावरील दोन चंदनाचे झाडे तोडणे सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्या वरून वनपाल एस जी खान सहकारी सोबत दुपारी शेतात पोहचले. शेतात अधिकारी पोहचणे अगोदर झाडे तोडणारे पळून गेले. सदर शेतात एम एच 28 वाय 2054 क्रमांकाची बजाज डिस्कवर गाडी जागेवरच सोडून चंदन तस्कर फरार झाले. वनपाल खान यांनी पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये ढगे यांनी मी शेगाव ला दवाखान्याचे कामाने गेलो होतो. शेतात आलेवर शेतातील धुऱ्यावरील चंदनाचे झाडे तोडले बाबत वनमजूर चितोडे यांनी माहिती दिली. याबाबत मला पूर्व कल्पना काहीच नव्हती. असे ढगे यांनी बयनात नमूद केल्याने तस्करीबाबत तर्क-वितर्क निघत आहेत. घटनास्थळावरून सदर इसम फरार झाले असले तरी मुद्दे माल किंमती चाळीस हजार आणि मोटरसायकल सोडून गेले. अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरवट परिसरात चंदनाची तस्करी होणे नवलाईची बाब म्हणावी असे नाही.

sangrampur

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Chandan smuggling racket activated in varvat bakal area in sangrampur

टॅग्स