आधी चंद्रकांत पाटील म्हणाले माध्यमांवर अघोषित आणीबाणी, मग केली सारवासारव

chandrakant patil commented on arnab goswami arrest in amravati
chandrakant patil commented on arnab goswami arrest in amravati

अमरावती : राज्यात प्रसार माध्यमांवर अघोषित आणीबाणीसोबत दंडूकेशाही सुरू आहे, असे आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. मात्र, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा पत्रकार विश्‍वातून निषेध होत नसताना भाजपला त्याचा कळवळा का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी सुटकेचा मार्ग स्वीकारला. गोस्वामींना अटक करण्याची पद्धत चुकीची वाटल्याने निषेधात्मक भूमिका घेतली, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

कोरोना संक्रमण आटोक्‍यात येत असताना भाजपने संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून बैठकांना सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गुरुवारी (ता. ५) अमरावतीत आले असताना प्रसार माध्यमांसोबत बोलत होते. माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. अनिल बोंडे, माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, संजय कुटे, चैनसुख संचेती, आमदार प्रताप अडसड, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर, महापौर चेतन गावंडे, माजी सभापती तुषार भारतीय यावेळी उपस्थित होते. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना संक्रमण नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी यावेळी ठेवला. शिक्षण, कृषी, शेतकरी सहकार्य, मराठा आरक्षण, कर्जमाफी या सर्व आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी झाले आहे. राज्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य सरकारने केवळ घोषणा केली असून ही मदत तोकडी आहे. तसेच शिक्षण विभागासह मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केल्याचा आरोप पाटलांनी यावेळी केला. 

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ भाजप लढणार -
अमरावती शिक्षक व नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवार देणार आहे. मात्र, या उमेदवारांना पक्षीय चिन्ह राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाकडे या दोन्ही मतदारसंघातून भरपूर नावे आली असून राज्याची कोअर कमिटी छाननी करून ते केंद्राकडे पाठविणार आहे. केंद्राची मोहोर उमटल्यानंतर त्यांच्या नावांची घोषणा केली जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली. दोन्ही मतदारसंघातील निवडणुका भाजप ताकदीने लढविणार आहे, असेही ते या वेळी म्हणाले. येत्या दोन-तीन दिवसांत नावे जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

अखेर दिलगिरी -
प्रसार माध्यमांसोबत वार्तालाप सुरू असताना चंद्रकांत पाटलांकडून एकेरी उल्लेख झाल्याने उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. अखेर पाटलांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरण आटोपते घेतले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासंदर्भात त्यांना प्रश्‍न करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांच्याकडून प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींसंदर्भात एकेरी उल्लेख झाला होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com