चंद्रपूर: खासगी बसला अपघात, 20 जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

आज सकाळी दहाच्या सुमारास खासगी बसला हा अपघात झाला. ही बस नागपुरला जात असताना वरोराजवळील चिनोरा या गावाजवळ एक ट्रक विरुद्ध दिशेने आला. चौपदरी महामार्ग असतानाही ट्रक चुकीच्या दिशेने आल्याने बस आणि ट्रकमधे समोरासमोर धडक झाली.

चंद्रपूर - चंद्रपूरहून नागपुरला जात असलेली खासगी बस आणि ट्रक यांच्यात आज (रविवार) सकाळी झालेल्या अपघातात बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहाच्या सुमारास खासगी बसला हा अपघात झाला. ही बस नागपुरला जात असताना वरोराजवळील चिनोरा या गावाजवळ एक ट्रक विरुद्ध दिशेने आला. चौपदरी महामार्ग असतानाही ट्रक चुकीच्या दिशेने आल्याने बस आणि ट्रकमधे समोरासमोर धडक झाली.

या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना वरोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचालक गंभीर जखमी आहे.

Web Title: Chandrapur: 20 people injured in a private bus accident