esakal | शिकारी कुत्र्यांच्या मदतीने होतोय हा प्रकार, वनविभागात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

In Chandrapur Chital hunting; Four accused in custody

मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबाअंतर्गत येणाऱ्या सूकवाशी बिटातील कक्ष क्रमांक 156 मध्ये शिकारी कुत्र्यांचा मदतीने चितळाची शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळाली. माहितीचा आधार घेत वनविभागाने नितेश मेश्राम, नारायण पंदिलवार, सीताराम कातलाम, शंकर कोडापे या चौघांना ताब्यात घेतले. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे वनविभागाने शिकारीचे घटनास्थळ गाठले असता तिथे चितळाचे मुंडके, तुटलेले पाय आढळून आले.

शिकारी कुत्र्यांच्या मदतीने होतोय हा प्रकार, वनविभागात खळबळ

sakal_logo
By
नीलेश झाडे

धाबा (जि. चंद्रपूर) : शिकारी कुत्र्यांच्या मदतीने चितळाची शिकार केल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागात खळबळ उडाली. याप्रकरणी वनविभागाने चार आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता वनविभागाने वर्तविली आहे. ही घटना मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबाअंतर्गत येणाऱ्या सूकवाशी बिटात घडली. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी या वनक्षेत्रात शिकारीची घटना उघडकीस आली होती.

मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबाअंतर्गत येणाऱ्या सूकवाशी बिटातील कक्ष क्रमांक 156 मध्ये शिकारी कुत्र्यांचा मदतीने चितळाची शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळाली. माहितीचा आधार घेत वनविभागाने नितेश मेश्राम, नारायण पंदिलवार, सीताराम कातलाम, शंकर कोडापे या चौघांना ताब्यात घेतले. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे वनविभागाने शिकारीचे घटनास्थळ गाठले असता तिथे चितळाचे मुंडके, तुटलेले पाय आढळून आले.

शिकार प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता वनविभागाने वर्तविली. काही महिन्यांपूर्वी सूकवाशी बिटाला लागूनच असलेल्या वटराणा वनक्षेत्रात सांबराची शिकार झाली होती. वेडगाव येथेही शिकारीची घटना उघडकीस आली होती. धाबा वनक्षेत्राअंतर्गत शिकारीच्या घटना वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

अवश्य वाचा- नदीपात्रात सुरू होते अंत्यसंस्कार, अचानक आला पाण्याचा लोंढा आणि...

वन्यजीव असुरक्षित

धाबा वनक्षेत्र वन्यजीवांचा महत्त्वाचा भ्रमणमार्ग समजला जातो. दुर्मिळ प्रजातींच्या वन्यजीवांचा येथे आवास आहे. मागील वर्षी या वनक्षेत्रातील तीन वाघ दगावले. शिकारीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. वनविभागाच्या कामचुकारपणामुळे वन्यजीव असुरक्षित झाल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींकडून केला जात आहे.

loading image