Chandrapur Crime News: हंसराज आहिर यांच्या पुतण्याच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; ग्लासांनी वाढवले गुढ Chandrapur crime Hansraj Ahir nephew death case Magnified glasses | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrapur Crime News

Chandrapur Crime News: हंसराज आहिर यांच्या पुतण्याच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; ग्लासांनी वाढवले गुढ

Chandrapur News: राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा पुतण्या महेश अहीर आणि त्याचा मित्र हरीश धोटे यांच्या संशयास्पद मृत्यूला पोलिस आत्महत्या म्हणत असली तरी याप्रकरणी मिळालेल्या नवीन माहितीमुळे या प्रकरणातील गुढ आणखी वाढले आहे.

चंडीगडनजीकच्या जंगलातील घटनास्थळी मिळालेली दारूची बॉटल व दोनपेक्षा अधिक ग्लास यामुळे याप्रकरणातील संशय वाढला आहे.(Latest Marathi News)

महेश व हरीश हे दोघेही उज्जैनला जातो असे सांगून घरून गेले होते. १५ मार्चला या दोघांचे भ्रमणध्वनी अचानक बंद झाले. त्यामुळे कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली.

बुधवारी अचानक चंडीगड पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांना फोन करून महेश व हरीश या दोघांचेही मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत चंडीगड येथील कजेहडी गावाजवळील जंगलात बुधवारी (ता. २२ मार्च) आढळल्याची माहिती दिली. त्यांच्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटली. चंडीगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले.(Marathi Tajya Batmya)

प्रारंभिक माहितीनुसार महेश आणि हरीश यांच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा नाहीत. त्यावरून या दोघांनीही आत्महत्या केली, असा दावा चंद्रपूर व चंडीगड या दोन्ही ठिकाणचे पोलिस करीत आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार दोघांच्या मृतदेहाजवळ दारूची बॉटल आणि काही ग्लास आढळून आले.

मिळालेल्या ग्लासची संख्या बघता आणखी काही जण त्यांच्यासोबत असावे, असा संशय आहे. त्यामुळेच या आत्महत्या प्रकरणाची संदिग्धता वाढली आहे. बुधवारीच ते डेहराडूनवरून बसने आले आणि थेट जंगलात गेले.

तत्पूर्वी परिसरातील एखाद्या हॉटेलमध्ये ते थांबले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. आत्महत्या करण्यासाठी हे दोघे दीड हजार किलोमीटर अंतरावरील अनोळखी जंगलात गेले, यावर विश्वास ठेवायला कुणीच तयार नाही.

आज अंत्यसंस्कार

शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द केले. आज रात्री मृतदेह चंद्रपूरला पोहोचणार आहेत. उद्या शुक्रवारी (ता. २४) चंद्रपुरातील शांतीधाम येथे दोघांवरही अंत्यसंस्कार होतील.