चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस मित्रांच्या हाती शिटी

संदीप रायपुरे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

गोंडपिपरी : समाजातील शांतता व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिसदादा रात्रदिवस कार्यरत असतात. पण सणसमारंभाच्या काळात परिस्थिती सांभाळताना निर्माण होणाऱ्या परिस्थितीने त्यांच्या नाकी नऊ येते. अशात पोलिसांना सहकार्य करणारी पोलिसमित्र यंत्रणा गतिमान करण्यासाठी पोलिस अधिक्षक डाँ.महेश्वर रेड्डी यांनी पुढाकार घेतला आहे.

गोंडपिपरी : समाजातील शांतता व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिसदादा रात्रदिवस कार्यरत असतात. पण सणसमारंभाच्या काळात परिस्थिती सांभाळताना निर्माण होणाऱ्या परिस्थितीने त्यांच्या नाकी नऊ येते. अशात पोलिसांना सहकार्य करणारी पोलिसमित्र यंत्रणा गतिमान करण्यासाठी पोलिस अधिक्षक डाँ.महेश्वर रेड्डी यांनी पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यातील पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावागावातून निवडक पोलिस मित्रांची निवड करून त्यांना पोलीसांना मदत करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.पोलीसमित्रांची ओळख स्पष्ट व्हावी यासाठी त्यांना पोलिसमित्र लिहिलेले टी शर्टसोबत टोपी व शिटी देण्यात आली आहे. यामुळे आता पोलिसांसोबत पोलिसमित्रांचीही शिटी नियम तोडणाऱ्यांना आवर घालण्यासाठी सज्ज झाली आहे.

गणेश विसर्जनापासून येणाऱ्या अनेक दिवसात विविधात धर्माचे उत्सव आहेत. हे सण समारंभ शांततापूर्वक संपन्न व्हावे, असे प्रत्येकाला वाटते. पण समास्यांनी प्रत्येकच घटकाच्या भागीदारीशिवाय हे होणे शक्य नसते. समाजातील विविध सणसमारंभाला व इतरही बाबींना पोलिस प्रशासनाला हातभार लागावा हा हेतू घेत जिल्हा पोलीस अधिक्षक डाँ.माहेश्वर रेड्डी यांनी पोलिस मित्र या संकल्पनेला बळकट करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.

समाजातील हुशार तरूण व पोलिस प्रशासन यांच्या समन्वयातून व्यवस्थेची नांदी टिकून राहावी या हेतूने त्यानी पोलिसमित्र चळवळीला गतिमान करण्याचा निर्णय घेतला.
यातूनच आता जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिसमित्रांची फौज निर्माण होत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पोलिसमित्र प्रिंट असलेली टी शर्ट, टोपी व शिटी देण्यात येत आहे.

आज गोंडपिपरीत अशा पंचेवीस पोलिस मित्रांची नियुक्ती करून त्यांना हे साहित्य देण्यात आले. गोंडपिपरीत वितरण
गोँडपिपरी पोलिस ठाण्यांअंतर्गत एकूण पन्नास पोलिसमित्र निवडण्यात आले आहेत. यापैकी पंचेवीस पोलिसमित्रांना आज गोंडपिपरी पोलिस ठाण्यात टि शर्ट, टोपी व शीटीचे वितरण करण्यात आले. गोंडपीपरीचे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांच्या हस्ते हे साहित्य वितरीत करण्यात आले.

Web Title: In the Chandrapur district police friend hands Sity