चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने गाठली सरासरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

चंद्रपूर - जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार 40 मिमी आहे. मात्र, यंदा पावसाने सरासरी गाठली. सप्टेंबर महिन्यापर्यंत एक हजार 135 मिमीची जिल्ह्यात नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद सावली तालुक्‍यात झाली. या तालुक्‍यात एक जूनपासून आतापर्यंत एक हजार 722.6 मिमी पाऊस पडला.

यावर्षी सुरुवातीला पावसाने खोडा घातला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट ओढवले. जूनच्या शेवटीपासून पावसाला सुरुवात झाली. जुलै महिन्याच्या प्रारंभी आणि शेवटीही समाधानकारक पाऊस पडला. याच पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी शेतीची कामे आटोपली. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही पाऊस पडला. त्यानंतर पावसाने "ब्रेक' दिला. पाऊस बेपत्ता झाल्याने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला होता. शनिवारपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने इरई धरणाचे सात दरवाजे रविवारी (ता. 25) उघडण्यात आले होते. त्यानंतर तीन दिवस पावसाची रिपरिप सुरूच होती.

Web Title: Chandrapur district reached the average rain