प्रचंड उन्हातही चंद्रपूरकरांनी बजावला हक्क 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी आज, बुधवारी मतदान पार पडले. सायंकाळी साडेपाचपर्यंत 46.23 टक्‍के मतदान झाले होते. साडेसहा वाजेपर्यंत सरासरी 55 ते 60 टक्के मतदानाचा अंदाज आहे. 

चंद्रपूरमध्ये आजही तापमान 46.2 अंश सेल्सिअस होते. मात्र, कडक उन्हाला न घाबरता मतदारांनी मताधिकार बजावला. शुक्रवारी (ता. 21) जिल्हा क्रीडासंकुलावरील बॅटमिंटन सभागृहात मतमोजणी होईल. तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. 

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निर्मितीनंतरची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक आहे. एकूण 17 प्रभागांमधील 66 जागांसाठी 460 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 367 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. शहराचे वाढते तापमान लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने महानगरातील मतदानाचा कालावधी साडेसहापर्यंत वाढविला होता. ऊन कमी झाल्यानंतर मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात केंद्रांवर गर्दी केली होती. सकाळी साडेसात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. प्रथम अनेक केंद्रांवर गर्दी दिसून आली. साडेअकरा वाजतापर्यंत 19.20 टक्के मतदान झाले होते. उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारनंतर मतदान केंद्रांवर फारशी गर्दी दिसून आली नाही. साडेतीन वाजेपर्यंत 36.27 टक्के मतदान झाले होते. चार वाजतानंतर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 46.23 टक्के तर त्यानंतरच्या एक तासात सरासरी 55 ते 60 टक्के मतदान झाले. 

तुरळक ठिकाणी गोंधळ 
शहरातील जनता कॉलेज, जटपुरा गेट परिसरात असलेल्या मतदान केंद्रातील चार मतदान यंत्रे बंद पडली होती. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया बंद होती. यंत्रातील बिघाड दुरुस्त केल्यानंतर मतदान पूर्ववत सुरू झाले. पक्षाचे बॅनर लावण्यावरून तुकुम, नगीनाबाग परिसरात गोंधळ उडाला. तसेच एका पक्षाच्या उमेदवाराने पैसे वाटप केल्याची तक्रार कॉंग्रेस उमेदवाराने केली. 

Web Title: Chandrapur municipal corporation election