चंद्रपूरः आपले सरकार सेवा केंद्राने वाढली डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

सेतु केंद्राच्या खिडकीला लागतोय विजेचा धक्का

चिमुर (चंद्रपूर): राज्य शासनाने आपले सेवा केंद्र या ऑनलाईन प्रणाली द्वारे तहसील कार्यालयातील नागरीकांची सर्व प्रकारची कामे करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अप्रशिक्षीत कर्मचारी आणी सततच्या लिंक फेलमुळे सामान्य नागरीकांना डोकेदुखी झाली आहे.

नागरीकांच्या पैसा, वेळ वाया जात आहे. एका कामाकरीता दोन ते तीन दिवस चकरा माराव्या लागत आहे. यामुळे नागरीकांना मानसीक त्रास होत आहे. शैक्षणीक सत्रांची प्रवेशाची वेळ असून या ऑन लाईन प्रक्रीयेने अनेकांचे प्रवेश रखडले असून, होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास कोण जबाबदार राहील? असा संतप्त सवाल नागरीक करीत आहेत.

चिमुर तहसील कार्यालयाच्या या सेतू केंद्राच्या खिडकीला विजेचे करंट असल्याची नागरीकात चर्चा आहे. त्यामुळे ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र कुचकामी व त्रासदायक असल्याची नागरीकांत चर्चा असून कर्मचारी सुद्धा दबक्या आवाजात चर्चा करीत आहेत.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: chandrapur news chimur aaple sarkar seva kendra

टॅग्स