मित्रांनी जपले रक्ताशी रक्ताचे नाते...

जितेंद्र सहारे
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

चिमूर (चंद्रपूर): मणुष्य हा समाजशील प्राणी आहे तरी सुद्धा आजच्या डिजीटल आणी जिवघेण्या स्पर्धा काळात तसेच वेगवान जिवन पद्धतीने जनू नाते संबध संपुष्टात तर येणार नाही ना? अशी काहीशी भयानक परिस्थीती असताना जिवलग मित्राच्या अचानक जाण्याने सुन्न झालेल्या मित्रांणी त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्याकरीता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्ताशी रक्ताचे नाते जपल्याचे चित्र चिमूर येथे पाहावयास मिळत आहे.

चिमूर येथील न्यू राष्ट्रीय विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक किशोर खोब्रागडे तसेच जिल्हा परीषद शाळेत शिक्षीका असलेल्या कुटूंबातील नव तरुण मुलगा पुष्कर पुढील भविष्याची स्वप्ने साकार करण्या करता नागपूर येथे इंजिनियरींगचे शिक्षण घेत होता. शिक्षणा दरम्यान हसतमुख शांत स्वभाव, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा असल्याने खुप मोठा जिवलग मित्र परीवार निर्माण झाला. मात्र, दोन वर्षापुर्वी १५ फेब्रुवारीला पुष्करचा अपघात झाला. अतिरक्तस्त्राव झाल्याने दवाखाण्यात भर्ती करण्यात आले. सर्व प्रकारचे उपचार दिल्या नंतरही पुष्करला वाचवता आले नाही.

पुष्करच्या मृत्युने खोब्रागडे परीवारावर आभाळ कोसळले. जिवलग मित्र हवालदिल झाले काही सुचेनासे झाले. एक वर्ष पाहता पाहता निघून गेले. एक वर्षाच्या प्रथम स्मृति दिवसा निमित्त सगळा पुष्करचा आप्त परीवार आणी जिवलग मित्रपरीवाराने रक्त दानाचे शिबिर आयोजीत केले. पुस्करचे जिव वाचविता आले नाही मात्र रक्तदानातून इतरांचे गरजूंचे जिव वाचविण्याचे कार्य करण्याच्या उद्देशाने मित्राणी पुढाकार घेऊन आयोजीत केलेल्या या अनोख्या स्मृती दिवसाचे प्रथमच चिमूरला आयोजन करण्यात आल्याने सगळ्यांना या रक्ताहुनही प्रीय मैत्री संबधांची वाहवा झाली.

आज (१५ फेब्रुवारी) दोन वर्ष होत आहेत. द्वितीय वर्षी सुद्धा पुष्करच्या स्मृती दिना निमीत्त भव्य रक्तदान शिबिराचे हुतात्मा स्मारक चिमूर येथे आयोजीत  करण्यात आले. दहा वाजता श्रद्धांजली कार्यक्रम घेऊन रक्तदानास सुरवात करण्यात आली. या शिबिरात सत्तर मित्र आणी शुभचिंतकांनी स्वय स्फुर्तीने जिवलग मित्रा करीता रक्तदान केले. पुष्कर मित्र परीवार, श्रीहरी बालाजी स्पोर्टीग क्लब, साई कल्पतरू फाऊंडेशन, पर्यावरण समीती, खोब्रागडे, पिसे आणी गिरडकर परीवारा तर्फ जि.एस. टि.ब्लड बँक चंद्रपूर श्रेयस लाखे, अमोल खुडसंगे, रजत कांबळे, मयुर पिसे, सोनू गिरडकर व सर्व मित्रांणी आभार मानले.

Web Title: chandrapur news chimur blood donation camp