चिमूरच्या नगराध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

चिमूर : चिमूर नगर परीषद क्षेत्रातील प्रभागात चुरीडस्ट, मुरूम ठेकेदारामार्फत पसरवीन्यात आला. ठेकेदाराने चुरीडस्ट, मूरूमचे देयकही उचलले आहे. मात्र नगराध्यक्ष यांनी मागील सभेत चुरीडस्ट, मुरूमाच्या ब्रासचा दर मंजुर करून देयके काढताना क्युबीक मीटरचे दर लावुन देयकावर सही केली. सभागृहाची दिशाभुल केली. डस्टचुरी, मुरूम या प्रकरणात मोठया प्रमानात अनियमितता दिसुन येत असुन मोठया प्रमाणात घोटाळा झाला आहे. यांची तक्रार काँग्रेसचे नगरसेवक विनोद ढाकुनकर यांनी नगराध्यक्ष शिल्पा राचलवार यांची तक्रार मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.

चिमूर नगर परिषद क्षेत्रातील सतरा प्रभागातील काही-काहीच ठिकाणी पावसाळ्यात रस्ते खराब झाले होते. त्यामूळे नागरीकांना आवागमन करण्यासाठी त्रास होवु नये म्हणुन बांधकाम साहीत्य पुरवठाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. याचा ठेका सिव्हील ठेकेदारानाला न देता नियम बाहय इलेक्ट्रीक ठेकेदाराला देण्यात आला. सदर कामाला नगर परिषदेकडून इपीएफ बंधनकारक असताना निवादा काढण्यात आल्या. त्यानुसार चुरीडस्ट, मुरूम प्रभागातील रस्त्यावर पसरविन्यात आला. बांधकाम साहीत्य चुरीडस्ट, मुरूमची बजेट मध्ये तरतुद व अंदाजपत्रक मंजूर नसताना कामाचे आदेश कसे काय देन्यात आले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसे असुन बांधकाम साहित्य सीएसआर व बाजारपेठ दरापेक्षा तीन पट दराने चुरीडस्ट नगर परिषद ने खरेदी केली. प्रभागात टाकलेल्या चुरीडस्ट, मुरमाचे मोजमाप न करता अवाजवी बिले काढन्यात आली.

डस्टचुरी, मुरूमचे बील काढताना मोजमाप पुस्तीकेत कुठेही नोंद नाही. साध्या कोऱ्या कागदावर बील काढत्यात आले. बांधकाम साहीत्य पुरवठा केल्याची लाखो रूपयांची देयके ठेकेदाराची नियम बाह्य पारित करन्यात आली. देयकाचा कुठेही ताळमेळ जुळत नाही. लाखो रुपयाच्या रस्त्याच्या मंजूरीसाठी सभागृहाची मंजुरी घ्यावी लागते. मात्र चुरीडस्ट प्रभागात पसरवीन्यासाठी दराच्या बाबतीत सत्ताधारी, विरोधक सभासदाचा विरोध असताना मंजुरी नसताना नगराध्यक्ष यांनी प्रस्तावावर सही केली. सीएसआर नुसार काम केले असते तर ३० % झाले असते. उलट सरकारचे ७० % वाचले असते व ते इतर जनहित कामासाठी वापरन्यात आले असते. मात्र कामात अनियमितता दाखवून नगराध्यक्षांनी सभागृहाची दिशाभूल करन्याचा प्रयत्न केला आहे.

नगराध्यक्ष यांनी सभागृहात सभासदाची दिशाभूल करीत सभागृहात ब्रास चे दर मंजूर करून क्युबीक मीटरचे दर लावुन चुरीडस्ट, मुरूम देयक प्रस्तावावर सही केली. या प्रकरनात मोठया प्रमानात घोटाळा झाला असुन दोषीवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करन्याची मागनी नगरसेवक विनोद ढाकुनकर यांनी केली असुन या प्रकरना विषयी नगराध्यक्ष शिल्पा राचलवार यांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com