अन्‌ रुग्णवाहिकेतच लागले लग्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्‍यातील वढोली येथील गणेश व पोंभुर्णा तालुक्‍यातील चिंतलधाबा येथील वैशाली यांचा विवाह ठरला. दोन्ही पक्षांची तयारी पूर्ण झाली. मात्र, लग्नाच्या तीन दिवस अगोदर वधू वैशालीची तब्येत अचानक बिघडली. आता काय करावे? असा प्रश्‍न दोन्ही पक्षाकडील लोकांना पडला. मग काय नवरीला चक्क रुग्णवाहिकेतून लग्नमंडपात आणले आणि वऱ्हाड्यांच्या साक्षीने शुभमंगल पार पडला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही घटना चिंतलधाबा येथे घडली. 

वढोली येथील गणेशचा विवाह पोंभुर्णा तालुक्‍यातील चिंतलधाबा येथील वैशाली हिच्याशी ठरला होता. दोन्ही परिवारात लगीनघाई सुरू असाताना लग्नाच्या तीन दिवस अगोदर अचानक वैशालीची तब्येत बिघडली. तिला चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. बुधवारी (ता.9) विवाह पार पडणार होता. नवरदेवाकडील वऱ्हाडी चिंतलधाब्याला पोहोचले, मात्र वधू अद्याप रुग्णालयातच होती. सोहळ्याची तयारी पूर्ण असताना आता करायचे काय? असा पेचप्रसंग दोन्ही पक्षांसमोर निर्माण झाला. अशा स्थितीत वैशालीला रुग्णवाहिकेतून सलाईन लावून मंडपात आणण्याचे ठरले. त्यानंतर रुग्णवाहिका विवाह स्थळी दाखल झाली आणि वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत शुभमंगल पार पडले.

Web Title: chandrapur news marriage in ambulance