घुग्घुस पंचायत समिती सदस्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

घुग्घुस (जि. चंद्रपूर) - येथील पंचायत समितीच्या सदस्य शालू शिंदे यांनी आज, मंगळवारी सकाळी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिस आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. 

काही महिन्यांपूर्वीच येथील पंचायत समितीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शालू विवेक शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली होती. घुग्घुस मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या. त्यांचे वॉर्ड क्रमांक सहा येथे घर आहे. त्यांचा ब्युटीपॉर्लरचा व्यवसायदेखील आहे. आज, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता ब्युटीपॉर्लर असलेल्या घराच्या वरच्या खोलीत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे पती विवेक हे चंद्रपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लिपिक आहेत. घटनेची माहिती होताच अनेकांनी त्यांच्या घरी भेट दिली. शालू शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नाही.

Web Title: chandrapur news panchyat committee member suicide