राजुरा विधानसभेतील विकास कामांना 20 कोटींचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

चंद्रपूरः राजुरा निर्वाचन क्षेत्रातील मतदार संघात २० कोटींचा विशेष निधी नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामे करण्याकरीता सुधीर मुनगंटीवार यांना केलेल्या मागणीच्या अनुशंगाने दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करून दिली.

चंद्रपूरः राजुरा निर्वाचन क्षेत्रातील मतदार संघात २० कोटींचा विशेष निधी नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामे करण्याकरीता सुधीर मुनगंटीवार यांना केलेल्या मागणीच्या अनुशंगाने दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करून दिली.

नगर पंचायत गोंडपिपरी करिता रस्ते, नाली, पाणी पुरवठा योजना, सार्वजनिक ठिकाणी सौंदर्यकरण करीता 10 कोटीची तरतूद करण्यात आली. राजुरा नगर परिषद करीता आमदार संजय धोटे यांना २२ नोव्हेंबर १६ रोजी दिलेल्या आश्वासनाचे अनुशंगाने रस्ते, नाली व अनेक विकास  कामासाठी 04 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. गडचांदुर नगर परिषद करीता रस्ते, नाली विविध प्रकारच्या विकास कामे करीता 02 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. कोरपना नगर पंचायत करिता रस्ते, नालीबांधकाम तसेच विविध  विकास कामाकरीता 20 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आली. जिवती नगर पंचायत करिता रस्ते, नाली बांधकाम तसेच विविध विकास कामाकरीता 02 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सन 2017-18च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे करण्यात आली.

राजुरा जनतेच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे राजुरा मतदार संघावर विशेष प्रेम असल्याने त्यांनी आतापर्यत विशेष निधी उपलब्ध करून दिली. मागील वर्षी राजुरा निर्वाचन क्षेत्रातील नगर परिषद व पंचायत हद्दीतील विकास कामे करीता 13 कोटी दिले होते. या वेळी सुद्धा विशेष मागणी करण्यात आली. 20 कोटी रुपयांचा निधी राजुरा विधानसभे करीता आमदार ऍड. संजय धोटे यांच्या मागणी नुसार दिले आहेत. आमदार धोटे यांच्या प्रयत्नातून मतदार संघाचा विकास झपाटाने होत असून, मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. मतदारसंघातील रस्ते, नाल्या अद्यावत असाव्या यासाठी ते सातत्याने शासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून विकास कामाकरिता निधी खेचून आणत असतात.

गेल्या वर्षी मुनगंटीवार यांनी विशेष निधी अंतर्गत निर्वाचन क्षेत्रातील शहरासाठी निधी दिलेला होता. या निधीतून मोठ्या प्रमाणावर शहरातील विकासाची कामे झालेली आहेत. शहरातील अनेक भागात चांगले रस्ते नसल्याने नागरिक यातना सहन करत होते. अनेक भागात चांगले रस्ते तयार झाले 4 ऑगस्टला आमदार धोटे यांनी मुबई येथे पावसाळी अधिवेशनात मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना मतदार संघासाठी निधीची मागणी केली व त्यांनीही तत्परतेने निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

आज आपल्याला मागणी प्रमाणे 20 कोटी रुपये दिलेले आहे. राजुरा मतदार संघासाठी आपण या मतदार संघाचा मागील 20 वर्षाचा असलेला अनुशेष काही प्रमाणात का होईना दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. लोकाभिमुख सरकार व आमदार संजय धोटे यांच्या कार्यतत्परतेमुळे या मतदार संघाच्या विकासाचा रथ चौफेर उधळलेला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्र हे आदिवासी बहुल नक्षलग्रस्त क्षेत्र असून आजपर्यंत अविकसित होते. आज काहीसा अंश दूर करून सामान्य जनतेला त्रास होणार नाही याचा प्रयत्न करीत आहोत. या भागात विविध प्रकारच्या योजना अंत्तर्गत विकास कामे सुरू असल्याने आमदार संजय धोटे यांच्या कार्यतत्परतेचे राजुरा विधानसभा क्षेत्राला स्वयंमी, शांतपणे विकास कामाचा ध्येय मनात ठेवून काम करणारे आमदार या क्षेत्राला लाभल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: chandrapur news rajura Fund sanctioned for development works